AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीला 12 दिवसांनंतर ब्रेक; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

ऐन महागाईत गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भावही वाढत आहेत. पण आज पेट्रोल डिझेलच्या दरात कुठलेही बदल झालेले नाहीत.

Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीला 12 दिवसांनंतर ब्रेक; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
पेट्रोल आणि डिझेल
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Feb 21, 2021 | 8:10 AM
Share

मुंबई : गेल्या 12 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये (Petrol Diesel Price Today 21 February) सातत्याने वाढ होत आहे. ऐन महागाईत गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भावही वाढत आहेत. पण आज पेट्रोल डिझेलच्या दरात कुठलेही बदल झालेले नाहीत. तरीही सध्या पेट्रोल डिझेलचे दर ऑल टाईम हायवर आहेत. देशातल्या अनेक भागांमध्ये शंभरच्या पार इंधन पोहोचलं आहे. (Petrol Diesel Price Today 21 February)

12 दिवसात पेट्रोल 3.28 रुपयांनी महागलं

तेल कंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी करतात. त्यानुसार गेल्या 12 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरावलेले आहेत. गेल्या 12 दिवसात पेट्रोल 3.28 रुपयांनी महागलं आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये तर पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. तर भोपाळमध्येही पेट्रोलचे दर 101.51 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर डिझेल गेल्या 12 दिवसात 3.49 रुपयांनी महागलं आहे.

दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलचे दरांनी कहर केला आहे. शुक्रवारी दिल्लीतल्या अनेक शहरांमध्ये 30 ते 35 पैशांनी इंधनामध्ये वाढ झाली होती.

प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर

नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 90.58 रुपये प्रति लिटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today): 97.00 रुपये प्रति लिटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today): 91.78 रुपये प्रति लिटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today): 92.59 रुपये प्रति लिटर

नोएडा (Noida Petrol Price Today): 88.92 रुपये प्रति लिटर

प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 80.97 रुपये प्रति लिटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.06 रुपये प्रति लिटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.56 रुपये प्रति लिटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today): 85.98 रुपये प्रति लिटर

नोएडा (Noida Diesel Price Today): 81.41 रुपये प्रति लिटर

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर

पुणे – 96.73

नागपूर – 97.51

कोल्हापूर – 96.79

नाशिक – 97.14

औरंगाबाद – 97.72

नांदेड – 98.92

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे दर

पुणे – 86.47

नागपूर – 88.62

कोल्हापूर – 86.55

नाशिक – 86.86

औरंगाबाद – 87.42

नांदेड – 88.59

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात (Petrol Diesel Price Today 21 February).

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.

Petrol Diesel Price Today 21 February

संबंधित बातम्या :

Petrol Diesel Price Today : शंभरी गाठूनही पुन्हा महागलं पेट्रोल-डिझेल, वाचा आजचे दर

परभणीत देशातील सर्वात महाग इंधन, पेट्रोल 98 रुपयांच्या पार, वाहनचालक त्रस्त

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीनं शंभरी गाठली, पुण्यात काँग्रेसचं मोदी सरकारविरोधात आंदोलन

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ