पुणे महापालिकेला कोरोनाचा फटका, बाग-बगीचे-प्राणी संग्रहालये बंद, तब्बल 11 कोटींचे उत्पन्न बुडाले

कोरोनाचा फार मोठा फटका पुणे महापालिकेला बसला आहे. शहरात दीर्घकाळ टाळेबंदी असल्याने तसंच कोरोनाचा प्रादुर्भाव पसरु नये, यासाठी शहरातील बाग-बगीचे, उद्याने, प्राणी संग्रहालये बंद होती.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:47 AM, 21 Feb 2021
पुणे महापालिकेला कोरोनाचा फटका, बाग-बगीचे-प्राणी संग्रहालये बंद, तब्बल 11 कोटींचे उत्पन्न बुडाले
पुणे महापालिका

पुणे :  गेल्या वर्षभरात पुण्यात कोरोना ठाण मांडून बसलाय. कोरोनाचा फार मोठा फटका पुणे महापालिकेला बसला आहे. शहरात दीर्घकाळ टाळेबंदी असल्याने तसंच कोरोनाचा प्रादुर्भाव पसरु नये, यासाठी शहरातील बाग-बगीचे, उद्याने, प्राणी संग्रहालये बंद होती. यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाला मोठा फटका बसलाय. उद्यान विभागाचे तब्बल 11 कोटींचे उत्पन्न बुडाले आहे. (Corona blow to Pune Municipal Corporation, gardens and zoos closed, income of Rs 11 crore lost)

पालिकेच्या उद्यान विभागाची शहरात कात्रज प्राणी संग्रहालये, आणि 200 पेक्षा अधिक उद्याने आहेत. ही उद्याने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीनर बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता.

महाराष्ट्रातील मेट्रो शहरांत कोरोनाचा खूपच प्रादुर्भाव पाहायला मिळाला. त्यातल्या त्यात पुण्यात तर कोरोनाने हैदोस घातला होता. त्यामुळे लोकांच्या आरोग्याला प्राधान्य देऊ प्रशासनाने शहरातील बाग-बगीचे, उद्याने प्राणी संग्रहालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाचा कोट्यवधी रुपयांचा निधी बुडाला आहे.

गेल्या वर्षभरापासून उद्याने बंद होती इथपर्यंत ठीक आहे परंतु आता शहरात कोरोनाने पुन्हा डोकं वरती काढायला सुरुवात केल्याने आणखी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

पुण्यात कोरोनाच्या हैदोसाला सुरुवात, प्रशासनाची तयारी काय?

राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या नव्याने वाढते आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूची नवी प्रजाती आढळली आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पुणे महापालिकेनेसुद्धा वाढत्या कोरोनाशी दोन हात करण्यासाठी कंबर कसली आहे. महापालिकेनं रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड्स तसेच इतर उपकरणं उपलब्ध करुन देण्याची सुविधा केली आहे. तसेच महापालिकेकडून 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रत्येकी किमान तीन क्युआरटी टीम तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रत्येक टीममध्ये आरोग्य निरीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.

खासगी रुग्णालये ताब्यात घेण्यास सुरुवात

पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे प्रशासनाने आपली तयारी सुरु केली आहे. बंद करण्यात आलेले कोव्हिड सेंटर पुन्हा एकदा सुरु केली जाण्याची शक्यता आहे. तसेच पुणे शहरात खासगी रुग्णालयाच्या खाटा ताब्यात घेण्यास पालिका सुरुवात करणार आहे. पुणे माहनगरपालिका आयुक्तांनी रुग्णालयांना तसे पत्रं पाठवली आहेत. कोरोना रुग्णांची होत असलेली वाढ लक्षात घेता उपचारासाठी खाटा कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

(Corona blow to Pune Municipal Corporation, gardens and zoos closed, income of Rs 11 crore lost)

हे ही वाचा :

पुण्यात कोरोना संसर्ग वाढतोय, प्रशासनाची तयारी काय ?, जाणून घ्या सध्याची परिस्थिती

Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीला 12 दिवसांनंतर ब्रेक; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर