AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘चॅलेंज देऊ नका, आम्ही दगडं मारुन सभा बंद…’, गुलाबराव पाटील यांचा मोठा इशारा

उद्धव ठाकरे यांच्या पाचोऱ्यातील सभेआधी मंत्री गुलाबराव पाटील आणि खासदार संजय राऊत यांच्यातील वाद चांगलाच पेटलेला बघायला मिळतोय. संजय राऊत सातत्याने गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करुन त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता गुलाबराव पाटील यांनीदेखील मोठा इशारा दिला आहे.

'चॅलेंज देऊ नका, आम्ही दगडं मारुन सभा बंद...', गुलाबराव पाटील यांचा मोठा इशारा
gulabrao patilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 22, 2023 | 6:03 PM
Share

जळगाव : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांची उद्या जळगावतील पाचोऱ्यात उद्या भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) पूर्वतयारीसाठी जळगावात गेले आहेत. या दरम्यान जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि संजय राऊत यांच्यात वाकयुद्ध रंगलेलं बघायला मिळतंय. संजय राऊतांनी जळगावात दाखल होताच जळगावात घुसलं अशा दोन शब्दांची प्रतिक्रिया देत गुलाबराव पाटील यांना डिवचलं. त्यानंतर दोन्ही बाजूने टीका-टीप्पणी सुरु आहेत. विशेष म्हणजे गुलाबराव पाटील यांनी यावेळी संजय राऊत यांना मोठा इशारा दिला आहे.

“उद्धव ठाकरे यांच्या सभेला कुणीही विरोध केलेला नाही. आर ओ तात्यांच्या पुतळ्याच्या कार्यक्रमाला कुणीही विरोध केलेला नाही. आर ओ तात्या आमचे जीवलग मित्र होते. ते आमच्या प्रत्येक सुख-दु:खात येणारे होते. त्यांच्या पुतळाच्या कार्यक्रमादरम्यान संजय राऊत नेहमी वेगळं वक्तव्य करत आहेत. आमचा त्यांना विरोध आहे. ते आजही गुलाबी गँग बोलले. त्यांना सगळं बोलायची मुभा आहे का?”, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला.

गुलाबराव पाटील यांनी नेमका इशारा काय दिला?

“माझ्या माहितीप्रमाणे हे जे नतद्रष्ट लोकं आहेत, ज्यांनी शिवसेनेची वाट लावली त्यांना आमचा विरोध आहे. ते म्हणाले मी जळगावात पाय ठेवला. रेल्वे स्टेशनवर दिसलं ना काय झालं, संजय राऊतांना दिसलं तिथे काय झालं ते, एकही कार्यकर्ता येऊ देणार नाही आणि आले तर जाऊ देणार नाही असं बोलत होते. अहो रेल्वे स्थानकावर कार्यकर्ते येऊन गेले. ते आले आणि वापस गेलेही. आम्हाला या आयडिया शिकवू नये. राऊत कोणत्याच आंदोलनात नव्हते. शिवसेनेचं आंदोलन कसं करावं हे त्यांना माहिती नाही. आम्ही दगडं मारुन लोकांच्या सभा बंद करणारे लोकं आहोत. त्यामुळे राऊतांनी आम्हाला चॅलेंज करु नये”, असा मोठा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला.

“आमच्या मतांवर खासदार झालेला, याची आम्हाला काय भीती? एवढा दम आहे तर खासदारकीचा राजीनामा द्यावा. पुन्हा खासदार होऊन दाखवा. आमची मतं घ्यायची, खासदार व्हायचं, पुन्हा आम्हालाच काहीही बोलायचं का? कोणत्या गणितात हे बसतं? आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. त्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये”, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.