वारीमुळे रस्ता जाम होतो तेव्हा आम्ही… नमाज पठणासाठी… अबू आझमींच्या विधानाची चर्चा; नेमकं काय म्हणाले?
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांंनी वारी आणि नमाज पठण यावर एक विधान केलं आहे.

Abu Azmi : संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची पालखी सध्या पुण्याच्या दिशेने पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. असे असताना समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचे वारीसंदर्भात एक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाची महाराष्ट्रभर चर्चा होत आहे. विशेष म्हणजे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील आझमी यांच्या विधानानंतर प्रतिक्रिया दिलीय. अबू आझमी सोलापूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी बोलत असताना त्यांनी वारी आणि नमाज पठण यावर भाष्य केलंय.
मुसलमानांनी नमाज पठण केल्यावर तक्रार…
वारीमुळे रस्ता जाम होतो. हिंदूंचे सण साजरे केले जातात. तेव्हा मुसलमान व्यक्ती विरोध करत नाही. मात्र मुसलमानांनी नमाज पठण केल्यावर तक्रार केली जाते. मशिदीबाहेर नमाज पठण केले जाऊ देत नाही, असं समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी म्हणाले आहेत.
हिंदू बांधवांसोबत खांद्याला खांदा लावून चालतो
आम्ही हिंदू बांधवांसोबत खांद्याला खांदा लावून चालतो. आजपर्यंत कोणत्याही मुसलमान बांधवांनी रस्त्यावर सण साजरे केले जातात त्याची तक्रार केली नाही. पण ज्यावेळेस मशिदीमध्ये नमाज पठण केले जाते. त्यावेळई युपीचे मुख्यमंत्री म्हणतात, बाहेर जर नमाज पठण केले तर पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग परवाना रद्द केला जाईल. आज सोलापूरला येत असताना मला सांगितलं पालखी येते. लवकर या नाहीतर रस्ता जाम होईल. वारीमुळे रस्ता जाम होतो आम्ही कधी त्याला मनाई केलं नाही. जाणून-बुजून मुसलमानांसाठी नमाज पठण करण्यासाठी जमीन दिली जात नाही, अशी खंत आझमी यांनी बोलून दाखवली.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
दरम्यान, आझमी यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आझमी हे नेहमीच वादग्रस्त विधानं करतात. वादग्रस्त विधानं केल्यावर प्रसिद्धी मिळते असे त्यांना वाटते. मात्र ते प्रसिद्धी देण्याच्या लायकीचे आहेत, असे मला वाटत नाही. त्यामुळेच मी यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, असे फडणवीस म्हणाले. ते नागपुरात माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.