AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MLC Election 2022: मावळ्याचा बळी गेला तरी चालेल, अनिल बोडेंची भविष्यवाणी कायम, सरकार वाचवण्यासाठी कुणाचा बळी जाणार?

राज्यसभेच्या वेळी आम्ही तिन्ही जागा जिंकू. आमच्या मनात अजिबात धाकधूक नाही. महाभारतात ज्या प्रमाणे अश्वत्थामा गेला त्याप्रमाणे या राज्यसभा निवडणुकीत आघाडीतील कोणता तरी एक संजय जाणार, असं विधान अनिल बोंडेंनी केलं होतं.

MLC Election 2022: मावळ्याचा बळी गेला तरी चालेल, अनिल बोडेंची भविष्यवाणी कायम, सरकार वाचवण्यासाठी कुणाचा बळी जाणार?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 20, 2022 | 2:01 PM
Share

मुंबईः राज्यसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेच्या एका ‘संजय’चा बळी जाणार अशी भविष्यवाणी करणाऱ्या अनिल बोंडेंनी आज आणखी एक भाकित केलंय. महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghdi Government) वाचवण्यासाठी शिवसेना आपल्या मावळ्याचा बळी देणार, असं वक्तव्य भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केलंय. शिवसेनाप्रमुख (ShivSena Chief) बाळासाहेब ठाकरेंच्या राज्यात असं कधीच घडलं नाही. शिवसैनिक हा पक्षाच्या केंद्रस्थानी होता. त्याचा बळी जाण्याचा प्रश्नच येत नव्हता. मात्र आजच्या शिवसेनेकडून सत्तेत राहण्यासाठी राजकारण केलंय जातंय. हे अत्यंत क्लेशदायी असल्याचं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केलंय. राज्यसभा निवडणुकीत अनिल बोंडेंनी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला होता. आता विधान परिषद निवडणुकीत शिवसेना आपलं सरकार वाचवण्यासाठी काँग्रेस सदस्यासाठी शिवसेना एका आमदाराला काँग्रेसला मतदान करायला लावेल आणि काँग्रेसचे भाई जगताप निवडून येतील, असाच अर्थ यातून निघतोय. अनिल बोंडेंची ही भविष्यवाणी खरी ठरतेय का, यावर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

काय म्हणाले अनिल बोंडे?

टीव्ही 9 शी बोलताना अनिल बोंडे म्हणाले, ‘ बाळासाहेब ठाकरेंच्या वेळी शिवसैनिक केंद्रस्ठानी होता. त्यांनी एखादी चूक केली तरी त्याच्या संरक्षणासाठी, त्याला वाचवलं पाहिजे.. त्याकरिता झळ सोसावी लागली तरी त्याच्या पाठिशी ताकतीने उभे राहत होते. आपलं मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद, सरकार वाचवण्यासाठी आपल्याच मावळ्याचा बळी द्यावा, असं होत नव्हतं, हे दुःख आहे…

मिशीवाला मावळा कोण?

विधान परिषद निवडणुकीसाठी प्रत्येक आमदाराचं मत लाख मोलाचं आहे. त्यामुळे अनेक नेते आपापल्या पक्षातील सदस्यांच्या संपर्कात आहेत. तसेच इतर पक्षांतील आमदारांशीही संवाद साधत आहेत. मागील तीन दिवसांपासून विविध पक्षांनी आपापल्या आमदारांना हॉटेलात मुक्कामी बोलावलं आहे. मात्र आमदार फोनवरून एकमेकांच्या संपर्कात आहेत. काल रात्री तर हे नाट्य अगदी शिगेला पोहोचलं. भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी दावा केलाय की, ते पहाटे चार वाजेपर्यंत शिवसेनेच्या आमदारांच्या संपर्कात होते. या चर्चेनंतरच त्यांनी उपरोक्त भाकित केलं. तसंच तत्पूर्वी त्यांनी सकाळी सकाळी एक ट्विट केलं. यात ते म्हणालेत, काळ आला होता भाऊ किंवा भाईवर.. पण मुख्यमत्री पद वाचवण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा… शिवसेनेतील बहुतांश आमदार मिशीवाले आहेत. त्यामुळे नेमक्या कोणत्या मावळ्याचा बळी जाणार, या कोड्यावरून आज राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

राज्यसभेच्या वेळी काय भाकित?

राज्यसभेच्या वेळी आम्ही तिन्ही जागा जिंकू. आमच्या मनात अजिबात धाकधूक नाही. महाभारतात ज्या प्रमाणे अश्वत्थामा गेला त्याप्रमाणे या राज्यसभा निवडणुकीत आघाडीतील कोणता तरी एक संजय जाणार, असं विधान अनिल बोंडेंनी केलं होतं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.