पुण्यातील मनसेच्या ऑफिसमध्ये भगवा रंग देण्यास सुरुवात

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) लवकरच आपल्या पक्षाची भूमिका बदलणार आहे. त्यासोबतच मनसेच्या झेंड्यातही बदल होणार आहे, अस बोललं (MNS Pune Office) जात आहे.

पुण्यातील मनसेच्या ऑफिसमध्ये भगवा रंग देण्यास सुरुवात
Follow us
| Updated on: Jan 09, 2020 | 5:05 PM

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) लवकरच आपल्या पक्षाची भूमिका बदलणार आहे. त्यासोबतच मनसेच्या झेंड्यातही बदल होणार आहे, अस बोललं (MNS Pune Office) जात आहे. येत्या 23 तारखेला मनसेच्या अधिवेशनात पक्षाची भूमिका आणि झेंड्याची घोषणा केली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण त्यापूर्वीच पुण्यातील मनसे कार्यालयात बदल झालेला दिसत आहे. या कार्यालयात भगव रंग देण्यात आला आहे. त्यासोबतच मनसेचा संभाव्य नवीन झेंडाही कार्यालयात लावला आहे. त्यामुळे मनसे हिंदुत्वाकडे वळणार, ही चर्चा पुण्यात (MNS Pune Office) सुरु आहे.

येत्या 23 जानेवारी रोजी मनसेचं पहिलचं अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी हे अधिवेशन आहे. या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपली नवी भूमिका जाहीर करणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण यापूर्वीच पुण्यातील मनसे कार्यालयात अनेक बदल झालेले दिसत आहेत. कार्यालयात रंगरगोटी केलीअसून कार्यालयाला भगवा रंग देण्यात आला आहे. तसेच नवा झेंडाही लावण्यात आला आहे. कार्यालयाबाहेर भगवे बॅनर लावले असून त्यावर राज ठाकरेंचे फोटो आहे. यामध्ये ‘माझा लढा महाराष्ट्र धर्मासाठी’ असं लिहिलं आहे.

मनसेचे महाअधिवेशन

शिवसेनेने भाजपची साथ सोडल्याने, मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता वर्तवली जात होती. गेल्या काही दिवसापासून तशा चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहेत. मनसेचं येत्या 23 जानेवारीला महाअधिवेशन होणार आहे. मनसेच्या कारकिर्दीतील हे पहिलं अधिवेशन आहे. या अधिवेशनात राज ठाकरे कोणती भूमिका जाहीर करणार याकडे मनसैनिकांचं लक्ष लागलं आहे.

मनसेच्या झेंड्यात अमूलाग्र बदल?

मनसेच्या नव्या झेंड्यामध्ये आमूलाग्र बदल केले जाणार आहेत. या नव्या झेंड्यामध्ये आता भगवा रंग प्रामुख्याने दिसणार आहे. विशेष म्हणजे झेंड्यामध्ये शिवरायांची मुद्राही छापली जाणार असल्याचे म्हटलं जात आहे.

फडणवीस-राज ठाकरे भेट

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मंगळवारी 7 जानेवारीला गुप्त भेट झाली होती. प्रभादेवी येथील हॉटेल इंडिया बुल्स स्कायमध्ये जवळपास दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली होती. महत्त्वाचं म्हणजे या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस हे पुढील दाराने, तर राज ठाकरे मागील दाराने बाहेर पडले. ‘टीव्ही 9 मराठी’च्या कॅमेऱ्यात ही दृश्यं कैद झाली होती.

या बैठकीसाठी अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली होती. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे मित्र गुरुप्रसाद रेगे हे या बैठकीला उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे या बैठकीसाठी कोणत्याही सुरक्षा रक्षकाशिवाय आले होते. तर देवेंद्र फडणवीस यांनीही या बैठकीबाबत मोठी गोपनीयता बाळगली होती. या भेटीनंतर गुरुप्रसाद रेगे देवेंद्र फडणवीस यांना गाडीपर्यंत सोडण्यासाठी खाली आले होते.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....