राज ठाकरे चंद्रशेखर बावनकुळेंना भेटण्याची शक्यता, युतीच्या चर्चांना उधाण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहेत.

राज ठाकरे चंद्रशेखर बावनकुळेंना भेटण्याची शक्यता, युतीच्या चर्चांना उधाण
| Updated on: Sep 18, 2022 | 3:04 PM

नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते अनेक नेते, पदाधिकाऱ्यांची भेट घेत आहेत. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची भेट घेणार आहेत, अशी चर्चा आहे. नागपुरातील त्याच्या घरी जात ते भेटणार असल्याची माहिती आहे. मागच्या काही दिवसांपासून मनसे भाजप युतीची चर्चा आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष आहे.