AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ती संघटना आहे की पक्ष मला कळत नाही, आदित्य ठाकरेंकडून मनसेची खिल्ली, टाईमपास टोळी उल्लेख

शिवसेनेकडून मनसेचा टाईमपास टोळी (MNS Timepass gang) असा उल्लेख केल्याने सेना-मनसे वाद रंगला आहे.

ती संघटना आहे की पक्ष मला कळत नाही, आदित्य ठाकरेंकडून मनसेची खिल्ली, टाईमपास टोळी उल्लेख
शिवसेना विरुद्ध मनसे सामना रंगला
| Updated on: Feb 04, 2021 | 1:36 PM
Share

मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेची (MNS) खिल्ली उडवली आहे. आदित्य ठाकरेंनी मनसेचा टाईमपास टोळी म्हणून उल्लेख केला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी शिवसेनेचा वीरप्पन टोळी (Shiv Sena Virappan gang) असा उल्लेख केला होता. आता शिवसेनेकडून मनसेचा टाईमपास टोळी (MNS Timepass gang) असा उल्लेख केल्याने सेना-मनसे वाद रंगला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चेंबूरमधील भक्ती पार्क परिसरात मियावाकी बागेची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना विविध प्रश्नांना उत्तरं दिली. (MNS said Shiv Sena is Virappan gang, Aaditya Thackeray replies MNS is Time pass gang)

मनसेबाबत आदित्य ठाकरे म्हणाले, “ती संघटना आहे की पक्ष आहे मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. मग आपण का द्यावं? ही तर टाईमपास टोळी आहे”

देवेंद्र फडणवीसांवर भाष्य

देवेंद्र फडणवीस यांनी इंधन दरकपातीबाबत जो सल्ला राज्य सरकारला दिला आहे, तोच सल्ला त्यांनी केंद्राला द्यावा, असं आदित्य ठाकरे म्हणाले. राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरचे टॅक्सेस कमी करावेत आणि भाववाढ नियंत्रणात आणावी, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

मनसेकडून शिवसेनेचा वीरपन्न टोळी असा उल्लेख

“वीरप्पनने जेवढं लोकांना लुटलं नसेल, त्यापेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत वीरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल” असं ट्विट संदीप देशपांडेंनी केलं होतं.

“मुंबई महापालिकेत वीरप्पन गँग काम करत आहे. ही वीरप्पन गँग महापालिकेची भरमसाठ लूट करत आहे. अनेक घोटाळे केले जात आहेत. तसंच स्थायी समितीची कामेही याच गँगला दिली जात आहेत. आता अशा गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल” असं म्हणत संदीप देशपांडे यांनी ”टीव्ही 9 मराठी’शी बोलताना शिवसेनेवर टीकास्त्र डागलं होतं.

वरुण सरदेसाईंचं उत्तर

“खरे वीरप्पन कोण, हे जनतेला चांगलेच माहिती आहे. आपल्यालाही माहित करुन घ्यायचे असेल तर ‘मनसे खंडणी’ असे फक्त google search करुन बघावे. Google च्या पहिल्याच पेजवर या बातम्या सापडतील. सगळ्या बातम्या वेगवेगळ्या आहेत, पण प्रत्येक जिल्हातील यांची स्टोरी सेम टू सेम आहे” असं ट्विट वरुण सरदेसाईंनी केलं होतं. सरदेसाईंनी ट्विटमध्ये काही बातम्यांचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

(MNS said Shiv Sena is Virappan gang, Aaditya Thackeray replies MNS is Time pass gang)

संबंधित बातम्या

मी वीरप्पनबद्दल बोललो, वरुणला का झोंबलं? संदीप देशपांडे-वरुण सरदेसाईंमध्ये ट्विटरवर जुंपली

…म्हणून बीएमसीतल्या विरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल : संदीप देशपांडे

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.