मी वीरप्पनबद्दल बोललो, वरुणला का झोंबलं? संदीप देशपांडे-वरुण सरदेसाईंमध्ये ट्विटरवर जुंपली

येणाऱ्या निवडणुकीत वीरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल" असं ट्विट संदीप देशपांडेंनी केलं होतं. (Sandeep Deshpande Varun Sardesai )

मी वीरप्पनबद्दल बोललो, वरुणला का झोंबलं? संदीप देशपांडे-वरुण सरदेसाईंमध्ये ट्विटरवर जुंपली

मुंबई : ‘वीरप्पन गॅंग’वरुन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि युवासेना नेते वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्यात ट्विटर वॉर रंगला आहे. आगामी निवडणुकीत वीरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल, असं ट्वीट देशपांडेंनी केल्यानंतर
‘खरे वीरप्पन कोण हे जनतेला चांगलेच माहिती आहे’ असं म्हणत सरदेसाईंनी उत्तर दिलं. त्यावर “मी वीरप्पनबद्दल बोललो, वरुणला का झोंबलं?” असं देशपांडेंनी विचारताच दोघांमध्ये ट्विटरवर जुंपली. (Sandeep Deshpande on Varun Sardesai Twitter War)

संदीप देशपांडेंचा हल्लाबोल

“वीरप्पनने जेवढं लोकांना लुटलं नसेल, त्यापेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत वीरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल” असं ट्विट संदीप देशपांडेंनी केलं होतं.

“मुंबई महापालिकेत वीरप्पन गँग काम करत आहे. ही वीरप्पन गँग महापालिकेची भरमसाठ लूट करत आहे. अनेक घोटाळे केले जात आहेत. तसंच स्थायी समितीची कामेही याच गँगला दिली जात आहेत. आता अशा गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल” असं म्हणत संदीप देशपांडे यांनी ”टीव्ही 9 मराठी’शी बोलताना शिवसेनेवर टीकास्त्र डागलं.

“रस्त्यांचा घोटाळा, नालेसफाईचा घोटाळा किंवा आता कोरोनाच्या काळातील घोटाळा असे किती तरी घोटाळे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केले आहेत. जनतेला जर यातून दिलासा द्यायचा असेल तर यांचा वध करावाच लागेल. यासाठी मनसे पुढाकार घेईन” असा निर्धारही देशपांडे यांनी बोलून दाखवला.

वरुण सरदेसाईंचं उत्तर

“खरे वीरप्पन कोण, हे जनतेला चांगलेच माहिती आहे. आपल्यालाही माहित करुन घ्यायचे असेल तर ‘मनसे खंडणी’ असे फक्त google search करुन बघावे. Google च्या पहिल्याच पेजवर या बातम्या सापडतील. सगळ्या बातम्या वेगवेगळ्या आहेत, पण प्रत्येक जिल्हातील यांची स्टोरी सेम टू सेम आहे” असं ट्विट वरुण सरदेसाईंनी केलं. सरदेसाईंनी ट्विटमध्ये काही बातम्यांचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.


मी वीरप्पनबद्दल बोललो होतो, वरुणला का झोंबलं माहीत नाही, असं म्हणत संदीप देशपांडेंनी पलटवार केला.


संबंधित बातम्या :

…म्हणून बीएमसीतल्या विरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल : संदीप देशपांडे

(Sandeep Deshpande on Varun Sardesai Twitter War)

Published On - 1:09 pm, Fri, 29 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI