AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोतीलाल व्होरा : काँग्रेसचा निष्ठावंत खजिनदार!

राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदावर घोषित करा, अशी मागणी करणाऱ्या काँग्रेस नेत्यांमध्ये मोतीलाल व्होरा यांचं नाव आघाडीवर होतं.

मोतीलाल व्होरा : काँग्रेसचा निष्ठावंत खजिनदार!
| Updated on: Dec 21, 2020 | 4:45 PM
Share

Motilal Vora passed away भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा (Motilal Vora profile) यांचं निधन झालं. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्ली येथील फोर्टिस एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. मोतीलाल व्होरा यांनी कालच 92 वा वाढदिवस साजरा केला होता. (Motilal Vora political journey)

मूळचे छत्तीसगडचे रहिवासी असलेले मोतीलाल व्होरा यांनी आपल्या राजकीय आयुष्यात अनेक महत्त्वाची पदं भूषवली. मोतीलाल व्होरा हे काँग्रेसचे खजिनदार म्हणून ओळखले जात होते. काँग्रेसचं खजिनदारपद त्यांनी निष्ठेने सांभाळलं. अनेक वर्ष हे पद सांभाळल्यानंतर, 2018 मध्ये त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव हे पद सोडलं. त्यामुळे काँग्रेसने हे पद अहमद पटेल यांच्याकडे सोपवलं.

राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदावर घोषित करा, अशी मागणी करणाऱ्या काँग्रेस नेत्यांमध्ये मोतीलाल व्होरा यांचं नाव आघाडीवर होतं.

मोतीलाल व्होरांची कारकीर्द

राजकीय कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी मोतीलाल व्होरा हे पत्रकार म्हणून कार्यरत होते. अनेक वर्षे त्यांनी पत्रकारिता केली. व्होरांच्या विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण सखोल लेखांना वाचकांची पसंती होती.

1968 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 1970 मध्ये त्यांनी मध्य प्रदेश विधानसभेची निवडणूक लढवली. पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवून ते रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष झाले. हे त्यांना मिळालेलं पहिलं पद होतं.

यानंतर मोतीलाल व्होरांनी मागे वळून पाहिलंच नाही. पुढे सलग तीन वेळा ते आमदार झाले. 1980 मध्ये त्यांची अर्जुन सिंहांच्या मंत्रिमंडळात उच्च शिक्षण मंत्रीपदी वर्णी लागली.

मुख्यमंत्रिपदी विराजमान

मोतीलाल व्होरा यांना 1983 मध्ये कॅबिनेट मंत्रिपदाबरोबर मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची धुरा मिळाली. अनेक महत्त्वाची पदं भूषवल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपद खुणावत होतं. अखेर 13 फेब्रुवारी 1985 रोजी मोतीलाल व्होरा हे मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.

व्होरांनी जवळपास 3 वर्षे मध्य प्रदेशचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं. त्यानंतर त्यांना काँग्रेसने केंद्रात पाचारण केलं. 14 फेब्रुवारी 1988 रोजी व्होरांकडे केंद्रात कुटुंब कल्याण आणि नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. केंद्रात मंत्रिपदाचा भार स्वीकारल्यानंतर दोनच महिन्यात व्होरा राज्यसभेचे सदस्य झाले.  व्होरा हे 26 मे 1993 ते 3 मे 1996 पर्यंत उत्तर प्रदेशचे राज्यपाल होते.

नॅशनल हेराल्ड खटल्यात नाव

मोतीलाल व्होरा हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. सोनिया गांधी यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. काँग्रेसच्या अनेक निर्णय प्रक्रियेत मोतीलाल व्होरांचं मत महत्त्वाचं ठरत होतं. एकीकडे काँग्रेसशी जवळीक आणि दुसरीकडे गांधी घराण्याशी संबंधित नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्र संपत्ती वादातही मोतीलाल व्होरांचं नाव होतं. हा खटला अजूनही कोर्टात प्रलंबित आहे.

असोसिएट जर्नल्स लिमिटेड, यंग इंडियन आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटी या तिन्ही संस्थांमध्ये मोतीलाल व्होरांना वरचं स्थान होतं. मोतीलाल व्होरा हे 22 मार्च 2002 रोजी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि संचालक होते. त्याआधी त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीचे कोषाध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं. मोतीलाल व्होरांकडे 12 टक्के शेअर्स होते.

गांधी घराण्याशी जवळचा संबंध

मोतीलाल व्होरा हे गांधी घराण्याच्या अतिशय जवळचे होते. राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्यासाठी मोतीलाल व्होरा यांनी पुढाकार घेतला होता.

(Congress leader Motilal Vora political journey)

संबंधित बातम्या 

Motilal Vora | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांचे निधन, दिल्लीत सुरु होते उपचार

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.