आधी आरक्षण, मगच भरती, संभाजीराजे छत्रपतींचा पवित्रा, मराठ्यांच्या डोळ्यात धूळफेक नको

मराठा आरक्षणाचा विषय निकाली लागल्याशिवाय भरती नको, अशी पोस्ट संभाजीराजेंनी फेसबुकवर टाकली आहे. (MP Chhatrapati Sambhaji Raje facebook Post On Police Bharti)

आधी आरक्षण, मगच भरती, संभाजीराजे छत्रपतींचा पवित्रा, मराठ्यांच्या डोळ्यात धूळफेक नको

नवी दिल्ली : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार छत्रपती संभाजीराजेंनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय निकाली लागल्याशिवाय कोणतीही भरती करु नका, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजेंनी केली आहे. फेसबुकवर पोस्ट टाकत संभाजी राजेंनी ही मागणी केली आहे. (MP Chhatrapati Sambhaji Raje facebook Post On Police Bharti)

“आधी आरक्षण आणि मगच भरती! हीच मराठा समाजाची भूमिका आहे. मराठा समाजाच्या 13 टक्के जागा सोडून पोलीस भरती काढू, असं बोलणं म्हणजे समाजाच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा प्रकार आहे. म्हणजे सरकारला आरक्षणाचा मुद्दा निकाली काढायचा नाहीये का? अशी शंका लोकांना येत आहे. यापुढे कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती काढली जाऊ नये, मग ती पोलीस भरती असो की ‘एम पी एस सी’ ची किंवा आणखी कुठलीही परीक्षा असो मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय निकाली लागल्याशिवाय भरती नको, अशी पोस्ट संभाजीराजेंनी फेसबुकवर टाकली आहे.

मराठा समाज इतर कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही, हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय. इतर सर्व समाज मराठा समाजाच्या सोबत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजांनीसुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाला सरकारने प्राधान्य द्यावं हीच भूमिका घेतली आहे. त्यांचे मी समाजाच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करतो.

त्यामुळे सरकारने पोलीस भरतीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा. ही समाजाच्या वतीने विनंती वजा सूचना आहे,” असे त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे आहे.

पोलीस भरतीत मराठा समाजासाठी 13 टक्के जागा बाजूला काढणार : अनिल देशमुख

दरम्यान “मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारचा सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहे. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पण ही पोलीस भरती करत असताना मराठा समाजासाठी 13 टक्के जागा बाजूला काढल्या जातील. यासाठी कायदेशीर बाबींची देखील तपासणी केली जाईल. राज्य शासनाचा मराठा समाजाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न आहे.” असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यापूर्वीचं म्हटलं आहे. (MP Chhatrapati Sambhaji Raje facebook Post On Police Bharti)

संबंधित बातम्या : 

राज्यातील पोलीस भरतीत मराठा समाजासाठी 13 टक्के जागा बाजूला काढणार : अनिल देशमुख

मराठा आंदोलकांना नोटिसा पाठवू नयेत, छत्रपती संभाजीराजे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *