AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री असताना एवढा संघर्ष केला असता तर आज… नवनीत राणांचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री असताना एवढा संघर्ष केला असता तर आज... नवनीत राणांचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
नवनीत राणा, खासदारImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 30, 2022 | 2:51 PM
Share

गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, नागपूर :  खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री (CM) असताना त्यांनी एवढा संघर्ष केला असता तर आज महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची ताकत त्यांनी मिळवली असती. उद्धव ठाकरे म्हणतात बाप चोरून नेला, बाप चोरून नेला नाही तर तुम्ही ज्या बापाचे विचार बाजुला ठेवले ते विचार पुढे नेण्याचं काम शिंदे गट करत असल्याचा घणाघात राणा यांनी केला  आहे. त्यांनी दसरा मेळाव्यावरून देखील उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात जबरदस्तीने लोक आणले जाणार आहेत, तर हिंदुत्त्व आणि बाळासाहेबांचे विचार ऐकायला लोक शिंदेंच्या मेळाव्याला गर्दी करतील असं राणा यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना नवनीत राणा यांनी म्हटलं आहे की, उद्धव ठाकरे हे एक अपरिपक्व राजकारणी आहेत, त्यांच्या राजकीय वक्तव्यावरून ते परिपक्व आहे असं वाटत नाही.  उध्दव ठाकरे बाळासाहेबांचे सुपुत्र आहे असं वाटत नाही. बाळासाहेबांनी जे मिळवलं त्याच्या दहा टक्केही उद्धव ठाकरे यांना मिळवता आलं नाही. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे जमिनीवर राहून संघर्ष करू शकत नसल्याची टीका नवनीत राणा यांनी केली आहे.

बच्चू कडूंवरही निशाणा

दरम्यान यावेळी नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. बच्चू कडू यांच स्वत:वर नियंत्रण राहिलं नाही. त्यांनी स्वत:ला सांभाळलं पाहिजे. कार्यकर्त्यांना मारणे हा कार्यकर्तांचा अपमान आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान त्यांनी ठेवायला हवा असं नवनीत राणा यांनी म्हटलं  आहे,

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा