AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून आम्ही शिवसेनेत प्रवेश केला; महंत सुनील महाराज यांची पहिली प्रतिक्रिया

बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी आज अखेर हाती शिवबंध बांधल. त्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

...म्हणून आम्ही शिवसेनेत प्रवेश केला; महंत सुनील महाराज यांची पहिली प्रतिक्रिया
| Updated on: Sep 30, 2022 | 2:07 PM
Share

मुंबई : बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवीचे (Pohradevi) महंत सुनील महाराज (Sunil Maharaj) यांनी आज अखेर हाती शिवबंध बांधल. त्यांंनी शिवसेनेत (Shiv sena) प्रवेश केला आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत खंबीरपणे उभं राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आज पोहरादेवीची यात्रा आहे. ज्या यात्रेला आपण पंचमीची यात्रा म्हणतो. या यात्रेसाठी दोन लाखांपेक्षा अधिक बंजारा समाज हा पोहरादेवीला आला आहे. असं शुभ मुहूर्त निवडून मी शिवसेनेत प्रवेश केल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच त्यांनी यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पोहरादेवीला येण्याचे निमंत्रण देखील दिले आहे.

नेमकं काय म्हणाले सुनील महाराज?

सुनील महारजा यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.  शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आपण उद्धव ठाकरेंसोबत खंबीरपणे उभं राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ते पुढे बोलताना म्हणाले की, बंजारा समाजाचे जवळपास दोन कोटी मतदार आहेत. या समाजाला विकासाच्या मुख्यप्रवाहात फक्त शिवसेनाच आणू शकते, त्यांना शिवसेनेमुळे सत्तेत वाटा मिळू शकतो यांची खात्री पटल्याने आम्ही शिवसेनेत प्रवेश केल्याचं सुनील महाराज यांनी म्हटलं आहे.

शिवसेवा संकल्प दौरा

यावेळी बोलताना सुनील महाराज यांनी शिवसेवा संकल्प दौऱ्याबाबत देखील माहिती दिली आहे. मी उद्धव ठाकरे यांना पोहरादेवीला येण्याचे आमंत्रण दिले आहे, त्यांनी देखील ते मोठ्या आनंदाने स्विकारले आहे. आम्ही राज्यभरात शिवसेवा संकल्प दौरा काढणार आहोत. या दौऱ्याला 17 नोव्हेंबरपासून सुरुवात होईल.  या दौऱ्याच्या माध्यमातून बंजारा समाज शिवसेनेशी जास्तीत जास्त कसा जोडला जाईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं  महंत सुनील महाराज यांनी म्हटलं आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा