AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्यार्थ्यांचे आवडते होते मुलायम सर, पाहा शिक्षक मुलायम सिंह यांचं करिअर

मुलायम सिंहांची विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत एकदम वेगळी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मुलायम सर आवडते होते. मात्र काही वर्ष प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर मुलायम सिंहांनी राजकारणात प्रवेश केला.

विद्यार्थ्यांचे आवडते होते मुलायम सर, पाहा शिक्षक मुलायम सिंह यांचं करिअर
विद्यार्थ्यांचे आवडते होते मुलायम सरImage Credit source: social media
| Updated on: Oct 10, 2022 | 6:47 PM
Share

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव (Mulayam Sing Yadav) यांचे आज निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. ब्लड प्रेशर, युरिन इन्फेक्शन आणि श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने मुलायम सिंह यांना काही दिवसांपूर्वी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. मुलायम सिंह तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. प्राध्यापक ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पदापर्यंतचा (Professor to Ex CM) मुलायम सिंहांचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे.

इटावा येथे सामान्य कुटुंबात जन्म

उत्तर प्रदेशातील इटावा येथे 22 नोव्हेंबर 1939 रोजी एका सामान्य कुटुंबात मुलायम सिंहांचा जन्म झाला. मुलायम यांनी पेहलवान व्हावे अशी त्यांच्या वडिलांची फार इच्छा होती. मात्र मुलायम शाळेतील शिक्षक उदय प्रताप सिंह हे शिक्षणावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी प्रेरित करायचे.

जैन इंटर कॉलेजमधून बॅचलर ऑफ टीचिंगची डिग्री

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलायम यांनी 1955 मध्ये मैनपुरीतील करहल स्थित जैन इंटर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर 1959 मध्ये त्यांनी या कॉलेजमधून बॅचलर ऑफ टीचिंगची डिग्री घेतली आणि 1963 मध्ये या कॉलेजमध्ये ते 120 रुपये महिना पगारावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

हायस्कूलमध्ये हिंदी आणि इंटरमध्ये सामाजिक विज्ञान विषय शिकवायचे. नोकरी करता करता त्यांनी आग्रा युनिव्हर्सिटीमधून पॉलिटिकल सायन्स विषयातून एम पूर्ण केले.

असा होता राजकीय प्रवास

मुलायम सिंहांची विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत एकदम वेगळी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मुलायम सर आवडते होते. मात्र काही वर्ष प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर मुलायम सिंहांनी राजकारणात प्रवेश केला. 1967 मध्ये ते उत्तर प्रदेशातील जसवंत नगर मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले.

आपल्या राजकीय प्रवासात मुलायम सिंह 8 वेळा आमदार आणि 7 वेळा लोकसभेचे खासदार होते. तसेच 1996 ते 1998 पर्यंत ते देशाचे संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली.

इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....