ते म्हणायचे मला पंतप्रधान व्हायचय, तशी संधी आलीही पण हुलकावणी मिळाली ती अशी…

मुलायमसिंह यादव 55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मुलायम सिंह यादव हे उत्तर प्रदेशचे तीनदा मुख्यमंत्री बनले होते.

ते म्हणायचे मला पंतप्रधान व्हायचय, तशी संधी आलीही पण हुलकावणी मिळाली ती अशी...
Follow us
| Updated on: Oct 10, 2022 | 4:17 PM

नवी दिल्लीः देशाच्या राजकारणातील कधी काळी सतत चर्चेत असलेलं नाव आणि उत्तर भारतात, ज्यांच्या नावाशिवाय राजकारणाची सुरुवातच होऊ शकत नाही असं नाव म्हणजे मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) . गेल्या पाच दशकापेक्षा अधिक काळ भारताच्या आणि उत्तर भारताच्या राजकारणात ते प्रचंड सक्रिय राहिले. 55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मुलायम सिंह यादव यांना भारताचं पंतप्रधान पद (Prime Minister ) मिळता राहिलं, त्या पदानं मात्र त्यांना हुलकावणी दिली आणि त्याची सल ते कायम बोलून दाखवत असत. ते देशाचे संरक्षण मंत्रीही (Minister of Defence) झाले होते, तर 7 वेळा खासदार आणि 8 वेळा विधानसभेत आमदार होते म्हणूनही त्यांची कारकीर्द प्रचंड गाजली आणि चर्चेत राहिली होती.

उत्तर प्रदेशमधील एका छोट्याशा खेड्यातून आलेल्या या मुलायम सिंह यांचे राजकारण म्हणजे चढ उताराचा एक आलेख होता. छोट्याशा खेड्यातून आलेल्या या माणसानं स्वतःच्या हिमतीवर लोकशाही व्यवस्थेच्या शिखरावर पोहचण्याची किमया केली होती.

मुलायम सिंह यादवांनी अगदी इंदिरा गांधी, राजीव गांधीते अगदी अटल-अडवाणी यांच्या कार्यकाळातही आपल्या नेतृत्व कौशल्याच्या जोरावर त्यांनी राजकारणात आपला एक गडद ठसा उमटविला होता.

मुलायम राजकारणातील खडतर प्रवास

मुलायम सिंह यादव हे नाव असं अचानक राजकारणात आले नाही, त्यांनी राम मनोहर लोहिया आणि राज नारायण यांच्याकडून राजकारणाचे धडे गिरवले. त्यानंतर 1967 मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशच्या जसवंतनगर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून त्यांनी पहिली धडक विधानसभेवर मारली.

1974 मध्ये मुलायम सिंह यादव भारतीय क्रांती दलाच्या तिकिटावर जसवंतनगर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.

1977 मध्ये मुलायम सिंह यादव पुन्हा भारतीय लोकदलाच्या तिकिटावर आमदार झाले.

मुलायमसिंह यादव 1985, 1989, 1991 आणि 1993 मध्ये जसवंतनगर मतदारसंघातून आमदार राहिले होते.

1996 मध्ये मुलायम सिंह यादव सहासवान मतदारसंघातून आमदार झाले, मात्र त्यांनी 1996 मध्येच या जागेचा राजीनामा दिला.

सलग 7 वेळा खासदार पदाची माळ गळ्यात

1996 मध्ये मुलायम सिंह यादव पहिल्यांदा मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले.

1998 मध्ये नेताजी संभलमधून दुसऱ्यांदा खासदार बनले

1999 मध्ये मुलायम सिंह यादव संभल आणि कन्नौजमधून खासदार झाले, मात्र 2000 मध्ये त्यांनी कन्नौजमधून राजीनामा दिला.

2004 च्या लोकसभा निवडणुकीत नेताजी पुन्हा मैनपुरी मतदारसंघातून उतरले आणि विजयी झाले. पण 2004 मध्येच त्यांनी राजीनामा दिला होता.

2009 मध्ये मुलायम सिंह यादव पाचव्यांदा मैनपुरीमधून खासदार म्हणून निवडून गेले.

2014 मध्ये, 16 व्या लोकसभेसाठी मुलायम सिंह यादव यांनी आझमगड आणि मैनपुरीमधून उमेदवारी दाखल केली होती. या दोन्ही ठिकाणी ते विजयी झाले, पण नंतर त्यांनी मैनपुरीतून राजीनामा दिला आणि अशा प्रकारे ते सहाव्यांदा खासदार झाले.

2019 मध्ये मुलायम सिंह यादव पुन्हा एकदा मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवले आणि पुन्हा एकदा ते विजयीही झाले.

मुख्यमंत्री पदाची हॅट्रीक मारली…

मुलायमसिंह यादव 55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मुलायम सिंह यादव हे उत्तर प्रदेशचे तीनदा मुख्यमंत्री बनले.

1989 मध्ये ते पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 1990 मध्ये केंद्रातील व्ही.पी. सिंग सरकारच्या पतनानंतर मुलायम सिंह यादव चंद्रशेखर यांच्या जनता दल (समाजवादी) मध्ये सामील झाले.

आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर ते मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. एप्रिल 1991 मध्ये काँग्रेसने या सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि मुलायमसिंह यादव सरकार कोसळले.

मुलायम सिंह यादव 1993 मध्ये ते दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी 1992 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली होती.

राज्यात नोव्हेंबर 1993 मध्ये निवडणुका होणार होत्या. मात्र त्यापूर्वी मुलायम सिंह यांनी बहुजन समाज पक्षासोबत युती केली होती. निवडणुकीच्या निकालानंतर मुलायम यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात त्यांना यश मिळाले.

आणि ते स्वतः मुख्यमंत्रीपदी पुन्हा विराजमान झाले. 1995 मध्ये मायावतींनी पाठिंबा काढून घेतला आणि हे सरकार पुन्हा कोसळले.

मुलायमसिंह यादव जेव्हा सप्टेंबर 2003 मध्ये पुन्हा यूपीचे मुख्यमंत्री झाले होते मायावती आणि भाजपने तेव्हा 2002 मध्ये मुलायम यांना रोखण्यासाठी युती केली होती.

त्यावेळी मायावती मुख्यमंत्री झाल्या होत्या पण 25 ऑगस्ट 2003 रोजी भाजपने पाठिंबा काढून घेतला आणि मायावतींना पायउतार व्हावे लागले होते.

त्यानंतर मुलायम सिंह यादव यांनी सप्टेंबर 2003 मध्ये बसपाचे बंडखोर नेते, अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मदतीने आपले सरकार स्थापन केले.

1996 मध्ये मुलायमसिंह यादव मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्याच वर्षी केंद्रात अनेक पक्षांच्या पाठिंब्याने संयुक्त आघाडीचे सरकार स्थापन झाले होते. त्यामुळे मुलायम सिंह यांनी संयुक्त आघाडीच्या सरकारला पाठिंबा दिला, आणि ते देशाचे संरक्षणमंत्री झाले.

तेव्हा एचडी देवेगौडा देशाचे पंतप्रधान झाले मात्र काही दिवसातच हे सरकारही कोसळले. ही घटना होती 1998 मधील.

मुलायम सिंह यादव यांनी आपल्या राजकीय प्रवास खूप मोठे चढ उतार पाहिले होते. सलग आमदार, खासदार, मुख्यमंत्री पद आणि मंत्रीपदावरही त्यांची वर्णी लागली होती.

त्यानंतर 1990 च्या दशकात मात्र पंतप्रधान पदाजवळ जाऊनसुद्धा त्यांना त्या पदाने हुलकावणी दिली होती. 1996 साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले होत.

त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली गेली मात्र भाजपकडूनही त्यांना बहुमत मिळाले नव्हते. या निवडणुकीत भाजपला 161 जागा मिळाल्या.

अटलबिहारी वाजपेयी यांनी 13 दिवसांनी राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर आता नवे सरकार कोण बनवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेसकडे 141 जागा होत्या. मात्र काँग्रेस आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी इच्छूक नव्हते.

यानंतर संमिश्र सरकार स्थापन करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. पंतप्रधानपदासाठी व्ही. पी. सिंह आणि ज्योती बसू यांची नावंही चर्चेत आली.

मात्र दोघांच्या नावावर अंतिम करार होऊ शकला नाही. यानंतर लालू यादव आणि मुलायम सिंह यादव यांचीच नावं पुढे आली. तोपर्यंत लालू प्रसाद यादव यांचा चारा घोटाळा उघड झाला आणि त्यात ते अडकले. त्यामुळेच त्यांचे नाव त्या शर्यतीतून बाद झाले.

मात्र त्या सगळ्या राजकीय गदारोळात मात्र मुलायमसिंह यांचे नाव निश्चित मानले जात होते, मात्र अखेरच्या प्रसंगी लालूंनी राजकीय खेळी करत त्यांच्या उमेदवारीलाच प्रचंड विरोध केला.

त्यांच्या या राजकारणात शरद यादवही सहभागी झाले, आणि मुलायम सिंह यांचे नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून बाहेर पडले. त्यावेळी एच. डी. देवेगौडा देशाचे पंतप्रधान झाले आणि मुलायम सिंह यादव संरक्षण मंत्री बनले.

1999 च्या लोकसभा निवडणुकीतही कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. मात्र त्यावेळीही मुलायम यांचे नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आले.

मात्र पुन्हा एकदा त्या राजकारणात त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला नाही. त्यानंतर एकदा बोलता बोलता त्यांनी सांगितले की, मला पंतप्रधान व्हायचे होते, पण लालू प्रसाद यादव, शरद यादव, चंद्राबाबू नायडू आणि व्हीपी सिंह यांच्यामुळे या पदानं मला हुलकावणी दिली होती.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.