AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं नवं मिशन!; ‘घर चलो अभियान’ची घोषणा, नेमकं काय आहे हे मिशन? जाणून घ्या…

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं 'घर चलो अभियान' नेमकं काय आहे? वाचा सविस्तर...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं नवं मिशन!; 'घर चलो अभियान'ची घोषणा, नेमकं काय आहे हे मिशन? जाणून घ्या...
Image Credit source: ANI
| Updated on: Jul 23, 2023 | 3:50 PM
Share

मुंबई | 23 जुलै 2023 : 2024 ची लोकसभा निवडणूक… उरलेत अवघे काही महिने… या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोट बांधणीला सुरुवात केली आहे. काही दिवसांआधी NDA ची दिल्लीत बैठक पार पडली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. तर INDIA अर्थात विरोधी पक्षांची कर्नाटकातील बंगळुरूमध्ये बैठक पार पडली. यात आगामी निवडणुकीबाबत रणनिती ठरवण्यात आली. आता भाजपने एका नव्या मिशनची घोषणा केली आहे.

‘घर चलो अभियान’

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ‘घर चलो अभियान’ घोषणा केली आहे. या अंतर्गत मोदी सरकारने मागच्या नऊ वर्षात केलेल्या कामांना जनतेपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांचं ट्विट जसंच्या तसं भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांच्या दुरदृष्टीतून राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे आज देशातील जनतेचे अनेक प्रश्न सोडवले जात आहेत. त्यांच्या सक्षम नेतृत्वात आज देश प्रगतीपथावर यशस्वीरित्या वाटचाल करत आहे. आदरणीय मोदीजींच्या संकल्पनेतून साकार झालेल्या केंद्र सरकारच्या योजना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवण्यासाठी व त्यांच्या नेतृत्वाप्रती समर्थन मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने “घर चलो अभियान” राबवले जात आहे.

याच “घर चलो अभियान” अंतर्गत उमरेड विधानसभा क्षेत्रातील कुही, उमरेड व भिवापूर या तिन्ही तालुक्यातील ११ गावांना भेट दिली. दौऱ्याची सुरुवात कुही तालुक्यातील तितूर येथून केली, त्यानंतर कुही, चापेगडी, वेलतूर, मांढळ या गावांना तर उमरेड तालुक्यातील आपतूर, मकरधोकडा, बेला, सिर्सी, उमरेड व भिवापूर तालुक्यातील नांद या गावांना भेटी देत ५००० हून अधिक नागरिकांशी प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधला. यानिमित्ताने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या ९ वर्षांच्या कामाचा लेखाजोखा मांडला व केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवली. त्याचबरोबर ९०९०९०२०२४ या क्रमांकावर कॉल करून मोदीजींना समर्थन देण्याचे आवाहन नागरिकांना केले.

यावेळी आबालवृद्धांमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाविषयी प्रचंड विश्वास दिसून आला. मोदीजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या कामगिरीबद्दल अनेकांनी आनंद व्यक्त केला. आज या अभियानाच्या निमित्ताने अतिशय सुखद अनुभव मिळाला.

यावेळी माझ्यासोबत नागपुर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, माजी आमदार सुधीर पारवे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोतदार, आनंदराव राऊत, रुपचंद कडू, भाजयुमो नागपुर ग्रामीण ज़िलाध्यक्ष आदर्श पटले, विवेक सोनटक्के, डॉ. शिरीष मेश्राम, रजनी लोणारे, माया पाटील, प्रमोद घरडे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

अतिशय उत्साहात व प्रेमाने नागरिकांनी स्वागत केले त्या सर्वांचे व सहभागी सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार!

प्रचंड बहुमत मिळवत पुन्हा एकदा भाजपला बहुमत मिळेल आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, असा विश्वास भाजप नेते व्यक्त करत आहेत. तर विरोधकांनीही कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी मोदी सरकार जाऊन आमचीच सत्ता येईल, असा दावा विरोधक करत आहेत. त्यामुळे आगामी निवडणूक ही रंजक होईल, यात काही शंका नाही…

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.