‘समीर वानखेडे प्रकरणावर मुख्यमंत्र्यांसोबत जुजबी चर्चा, तक्रार दाखल झाल्यावर कारवाई करु’, गृहमंत्र्यांकडून स्पष्ट

| Updated on: Oct 25, 2021 | 6:08 PM

समीर वानखेडे प्रकरणावर आपली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत जुजबी चर्चा झाल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. याबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका ते स्वत:च स्पष्ट करतील असंही वळसे-पाटील म्हणाले.

समीर वानखेडे प्रकरणावर मुख्यमंत्र्यांसोबत जुजबी चर्चा, तक्रार दाखल झाल्यावर कारवाई करु, गृहमंत्र्यांकडून स्पष्ट
दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री
Follow us on

मुंबई : मुंबई ड्रग्स प्रकरणाला रोज नवं वळण मिळत आहे. आता प्रभाकर साईल यांच्या एका व्हिडीओमुळे समीर वानखेडे अडचणीत आले आहेत. या प्रकरणात 25 कोटीची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यानंतर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत अधिक आक्रमक झाले आहेत. तर साईल यांनी केलेल्या मागणीनुसार मुंबई पोलिसांकडून त्यांना संरक्षण देण्यात आलं आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर कारवाई करु, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. (Discussion between CM Uddhav Thackeray and Dilip Walse Patil on Sameer Wankhede case)

समीर वानखेडे प्रकरणावर आपली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत जुजबी चर्चा झाल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. याबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका ते स्वत:च स्पष्ट करतील असंही वळसे-पाटील म्हणाले. तर प्रभाकर साईलचं प्रतिज्ञापत्र मी पाहिलं आहे. त्यांना जी स्वत:च्या जीवाची भीती वाटते त्यासाठी त्यांनी संरक्षण मागितलं होतं. त्यांना पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली आहे, अशी माहिती वळसे-पाटलांनी दिली.

‘तक्रार दाखल केल्यानंतर कारवाई करु’

दरम्यान, या प्रकरणात आपण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची भेट घेऊन कारवाईची मागणी करणार असल्याचं अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं होतं. त्याबाबत विचारलं असता. नवाब मलिक यांची आणि माझी भेट झालेली नाही. त्यांची भेट झाल्यानंतर त्यांचं म्हणणं समजून घेऊन पुढील कारवाई करु, असं गृहमंत्री म्हणाले. तसंच कारवाई करण्यासाठी कुणीतरी तक्रार दाखल करायला हवी. तशी तक्रार दाखल झाल्यानंतर आम्ही कारवाई करु, असंही वळसे-पाटलांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर आजपर्यंत केंद्रीय यंत्रणांचा असा वापर कधीही झाला नव्हता. आता जास्त वापर होतोय. सरकार आणि राजकीय व्यक्तींना वेठीला धरलं जात आहे, अशी टीकाही त्यांनी केंद्र सरकारवर केलीय.

मुंबई सत्र न्यायालयाने वानखेडेंची याचिका फेटाळली

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना पहिला धक्का बसला आहे. प्रभाकर साईल याने केलेले आरोप ग्राह्य धरु नये, यासाठी वानखेडे यांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. हायकोर्टात प्रकरण असल्यामुळे सुनावणीला सत्र न्यायालयानं नकार दिला आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

वानखेडे यांनी सत्र न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. वैयक्तीक बदनामी केली जात आहे. सोशल मीडियावर कुटुंबियांची खासगी माहिती उघड केली जात आहे. याबाबत त्यांनी एक प्रतिज्ञापत्र साद करुन तीन मागण्या केल्या होत्या. या सगळ्याचा परिणाम तपासावर होत असल्याचंही वानखेडे यांनी त्यात म्हटलं आहे. त्यामुळे तातडीने सुनावणी घ्यावी अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, सत्र न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आहे. तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते उच्च न्यायालयात सांगा. सत्र न्यायालयासाठी हे प्रकरण पूर्णपणे संपलं आहे, असं सत्र न्यायालयाने म्हटलं आहे. दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्यानंतर आता समीर वानखेडे उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

इतर बातम्या :

समीर वानखेडेंना पहिला धक्का, मुंबई सत्र न्यायालयाने याचिका फेटाळली! आता पुढे काय?

‘शेतकर्‍यांना फुटकी कवडी नाही आणि नेत्यांच्या घरात पॅकेज जातं’, बिलोलीतून फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Discussion between CM Uddhav Thackeray and Dilip Walse Patil on Sameer Wankhede case