‘शेतकर्‍यांना फुटकी कवडी नाही आणि नेत्यांच्या घरात पॅकेज जातं’, बिलोलीतून फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

बिलोलीमधील सभेतून देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. 'योजना बंद आणि वसुली सुरु, हे चालू लोकांचं चालू सरकार आहे. शेतकऱ्यांना फुटकी कवडी नाही आणि नेत्यांच्या घरात पॅकेज जात आहेत', असा घणाघात फडणवीस यांनी केलाय.

'शेतकर्‍यांना फुटकी कवडी नाही आणि नेत्यांच्या घरात पॅकेज जातं', बिलोलीतून फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 5:31 PM

नांदेड : देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारासाठी सभांचा धडाका लावला. बिलोलीमधील सभेतून देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‘योजना बंद आणि वसुली सुरु, हे चालू लोकांचं चालू सरकार आहे. शेतकऱ्यांना फुटकी कवडी नाही आणि नेत्यांच्या घरात पॅकेज जात आहेत’, असा घणाघात फडणवीस यांनी केलाय. (Devendra Fadnavis criticizes Mahavikas Aghadi government for Farmers issue)

राज्याच्या तिजोरीत पैसा आहे, पण महाविकास आघाडी सरकारमध्ये नियत नाही. कोरोनाच्या कालखंडात एकाही घटकाला त्यांनी मदत केली नाही. लोक जगत आहेत की मरत आहेत यांची पर्वा त्यांनी केली नाही. हे महाविकास आघाडी सरकार जनविरोधी आहे. यांनी मराठा, ओबीसी सगळ्यांचं आरक्षण घालवलं. मराठवाडा वैधानिक विकास मंडळ बंद केलं. पण, मराठवाड्यातील एकही मंत्री बोलला नाही. हा साझा विषय नाही. पुढच्या अनेक पिढ्यांच्या तोंडचा विकास पळवून नेण्याचा हा प्रकार आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागलं.

‘राज्यात केवळ बंद सरकार’

तत्पूर्वी नांदेडच्या कुंडलवाडी इथं बोलताना फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारनं बंद केलेल्या योजनांचा पाढाच वाचला. राज्यातील सरकारची 2 वर्षातील उपलब्धी काय? जलयुक्त शिवार बंद, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना बंद, नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना बंद, स्मार्ट योजना बंद, ड्रीप इरिगेशन बंद, रस्त्यांची कामे बंद, धरणांची कामे बंद, शेतकऱ्यांचा विमा, वीज बंद, शेतकऱ्यांना मदत बंद, राज्यात केवळ बंद सरकार उरलं असल्याचा घणाघात फडणवीस यांनी केला.

‘बायकोनं मारलं तर केंद्रानं मारलं म्हणून सांगतील’

महाविकास आघाडीतील लोक कशात भ्रष्टाचार करतील याचा नेम नाही. जमेल त्यात खात आहेत. सामान्य माणसाची अवस्था वाईच आहे. अतिवृष्टीत मोठं नुकसान झालं पण या सरकारने रुपयांची मदत केली नाही. बोलायला बांधावर जातात, मोठ्या घोषणा करतात. पण यांचे पैसे सरकारला मिळत नाहीत. पीक विम्याचे पैसेही शेतकऱ्यांना मिळत नाहीत. हे इतके लबाड आहेत की काहीही झालं की केंद्रावर ढकलतात. बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं असं सांगतील, अशी खोचक टीका फडणवीसांनी केलीय.

इतर बातम्या :

बिबवेवाडीतील हत्याकांडासारख्या घटना रोखण्यासाठी कायद्याचा धाक हवा, चंद्रकांत पाटलांचं मत; 2 लाखाच्या मदतीची घोषणा

प्रभाकर साईलला पोलिस संरक्षण, सर्व पुरावे क्राईम ब्रँचकडे; समीर वानखेडेंवर मुंबई पोलिस कारवाई करणार?

Devendra Fadnavis criticizes Mahavikas Aghadi government for Farmers issue

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.