AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2022 : वार्ड क्र. 204 मध्ये शिवसेना-भाजप मुख्य दावेदार, यंदा काय राहणार चित्र?

सन 2017 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले असले तरी शिवसेनेचे अनिल कोकीळ आणि भाजपाचे उमेदवार अरुण दळवी यांच्यातच खरी लढत होती. असे असताना 6 हजार 110 मतांनी कोकीळ हे विजयी झाले होते. वार्डातील मताधिक्याच्या तुलनेत हा मोठा विजय असला तरी इतर पक्षातील उमेदवारांना मतदारांनी डावलले आहे.

BMC Election 2022 : वार्ड क्र. 204 मध्ये शिवसेना-भाजप मुख्य दावेदार, यंदा काय राहणार चित्र?
मुंबई महापालिका
| Updated on: Jun 10, 2022 | 6:39 AM
Share

मुंबई :  (BMC) मुंबई महानगरपालिकेच्या 204 वार्डामध्ये (Shivsena) शिवसेना आणि भाजपात खरी चुरस आहे. 2017 च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार अनिल सदाशिव कोकीळ यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला होता. अनिल कोकीळ यांनी भाजपाचे उमेदवार अरुण दळवी यांचा 6 हजार 110 मतांनी पराभव केला होता. असे असले तरी गेल्या 5 वर्षात या मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे यंदा होणाऱ्या (Election) निवडणुकीत भाजपाचे सेनेसमोर कडवे आव्हान राहणार आहे. इतर पक्षातील उमेदवरांना मतदारांनी डावलले आहे. शिवाय या वार्डामध्ये प्रमुख पक्षामध्ये लढत झाली होती. विशेष म्हणजे या वार्डात एकही अपक्ष उमेदवार 2017 च्या निवडणुकीत नव्हता. त्यामुळे मुख्य पक्षातील उमेदवार आपले सर्वस्व पणाला लावणार हे नक्की. हा वार्ड शिवसेनेचा मानला जात असला तरी यंदा या वार्डाकडे लक्ष लागले आहे.

6 हजार 110 मतांनी शिवसेना उमेदवार विजयी

सन 2017 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले असले तरी शिवसेनेचे अनिल कोकीळ आणि भाजपाचे उमेदवार अरुण दळवी यांच्यातच खरी लढत होती. असे असताना 6 हजार 110 मतांनी कोकीळ हे विजयी झाले होते. वार्डातील मताधिक्याच्या तुलनेत हा मोठा विजय असला तरी इतर पक्षातील उमेदवारांना मतदारांनी डावलले आहे. त्यामुळे यंदाची निवडणुक नेमक्या कोणत्या मुद्द्यावर होणार यावरच येथील राजकीय गणिते अवलंबून आहेत.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनाअनिल सदाशिव कोकीळ
भाजपअरुण दळवी
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेससावंत प्रकाश रामकृष्ण
मनसेदेसाई सचिंद्र गणपत
अपक्ष / इतर

अपक्षाविना प्रमुख पक्षांमध्येच खरी लढत

वार्ड क्र. 204 मध्ये भाजपा, शिवसेना, मनसे, बहुजन समाज पार्टी आणि कॉंग्रेसमध्येच लढत झाली होती. इतर वार्डामध्ये अपक्षांच्या मतावर विजयी उमेदवार ठरला गेला असला तरी 2017 च्या निवडणुकीत या वार्डामध्ये अपक्षाने या वार्डात नशीब आजमावलेच नव्हते. तर नोटाला 524 मतदारांनी पसंती दर्शवली होती. शिवाय भाजप आणि शिवसेना वगळता इतर पक्षांच्या उमेदवाराची मताची झोळी ही रिकामीच राहिलेली आहे. गत निवडणुकीत येथील चित्र वेगळे राहिले असले तरी यंदा राज्याच्या राजकारणापासून येथील वार्डापर्यंतची राजकीय समीकरणे ही बदलेली आहेत. त्यामुळे कोणता पक्ष कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार यावरच येथील राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

अशा आहे मतांची गोळाबेरीज

>> अरुण दळवी (भाजपा)- 7300

>> देसाई सचिंद्र गणपत (मनसे)- 2772

>> खळे स्वप्निल मदन (बहुजन समाज पार्टी)- 144

>> अनिल सदाशिव कोकीळ (शिवसेना)- 13,410

>> सावंत प्रकाश रामकृष्ण (कॉंग्रेस) 1420

>> नोटा- 524

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.