BMC Election 2022 IC Colony Ward No 1 : मुंबई पालिकेच्या नंबर एक वॉर्डमध्ये कोण काढेल पहिला नंबर?

| Updated on: Jun 10, 2022 | 12:50 AM

MC Election 2022 Ward No 1 : 2017 साली या वॉर्डमध्ये सर्व महिलाच रिंगणात एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या होत्या.

BMC Election 2022 IC Colony Ward No 1 : मुंबई पालिकेच्या नंबर एक वॉर्डमध्ये कोण काढेल पहिला नंबर?
वॉर्ड नंबर एकमध्ये कुणाची बाजी?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

BMC Election 2022 Ward No 1 मुंबई : आशियातील सर्वात श्रीमंत पालिकांच्या यादीत नंबर एक वर असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड नंबर एक (BMC Ward No. 1) हा महत्त्वाचा वॉर्ड आहे. मुंबईची सीमा जिथून सुरु होते, तोच हा मुंबईचा (Mumbai Election) वॉर्ड नंबर एक. या वॉर्डची रचना, या वॉर्डमध्ये 2017 मध्ये महिला उमेदवार विययी झाली होती. शिवसेनेच्या महिला उमेदवारानं 2017 मध्ये वॉर्ड क्रमांक एक मधून विजय मिळवला होता. मुंबई पालिकेच्या (BMC Election 2022) वॉर्ड क्रमांक एक मध्ये कोणकोणता भाग मोडते आणि हा वॉर्ड नव्या संरचनेप्रमाणे, आता कसा झाला आहे, तेही समजून घेणार आहोत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत या वॉर्डमध्ये रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. 2017 मध्ये मुंबई पालिकेच्या लढतीत सर्वच पक्ष एकएकटे लढले होते. मुंबईच्या वॉर्ड नंबर एकमध्ये नेमकं चित्र काय होतं, याचीही उत्सुकता लोकाांना लागली आहे. या लढतीत कोण बाजी मारतं, याकडे संपूर्ण मुंबईचं बारीक लक्ष लागलेलं असणार आहे. चला तर जाणून घ्या, मुंबईच्या वॉर्ड नंबरची एकची गोष्ट…

वॉर्ड नंबर एकमध्ये नेमका कोणकोणता भाग मोडतो?

गणपत पाटील नगर, बोरीवली आरटीओ, दहिसर नदी, आयसी कॉलनी

वॉर्ड आरक्षित झालाय का?

वॉर्ड क्रमांक एक हा महिलांसाठी आरक्षित आहे असं वाटू शकतं. कारण 2017 साली या वॉर्डमध्ये सर्व महिलाच रिंगणात एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या होत्या. पण 2022 च्या पालिका निवडणुकीत हा वॉर्ड आरक्षित करण्यात आलेला नाही. वॉर्ड क्रमांक एक ओपन कॅटेगिरीमध्ये ठेवण्यात आला.

हे सुद्धा वाचा

2017 मधील चित्र नेमकं काय होतं?

  1. शिवसेना तेजस्वी घोसाळकर 4913
  2. अपक्ष रेखा यादव 3089
  3. भाजप सुचि यादव 2719
  4. काँग्रेस शितल म्हात्रे 2584
  5. मनसे ज्योती वाडेकर 179
  6. राष्ट्रवादी सरितादेवी पांडे 207

2017च्या निवडणुकीतील विजयी उमेदवार – तेजस्वी घोसाळकर, शिवसेना

शिवसेनेच्या उमेदवाराचा 2017 च्या निवडणुकीत विजय झाला होता. वॉर्ड क्रमांक एकमध्ये 2017 साली अपक्ष आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये काटे की टक्कर झाली होती. मनसेचा उमेदवारही या वॉर्डमधून निवडणुकीला उभा राहिला होता. पण शिवसेनेच्या तेजस्वी घोसाळकर यांनी 2017 साली वॉर्ड क्रमांक एकमधून शिवसेनेचा विजयी झेंडा पालिकेवर फडकवला होता. 1824 मतांनी तेजस्वी घोसाळकर यांचा विजय झाला होता.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनातेजस्वी घोसाळकर4913
भाजपसुचि यादव2719
राष्ट्रवादी काँग्रेससरितादेवी पांडे207
काँग्रेसशितल म्हात्रे2584
मनसेज्योती वाडेकर179
अपक्ष / इतररेखा यादव3089

2017 मधील एकूण मतदार आणि मतांची आकडेवारी

  1. एकूण किती मतदार? 24793
  2. एकूण वैध मतं किती होती? 14445
  3. नोटाला किती जणांनी मतदान केलं? 207

वॉर्डची लोकसंख्या किती?

  1. एकूण लोकसंख्या 56020
  2. अनुसूचित जाती 1198
  3. अनुसूचित जमाती 401

सुप्रीम कोर्टानं ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेत कोण जिरवणार आणि कोण मिरवणारी, याची चर्चा रंगली होती. गेली अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचं निर्विवाद वर्चस्व राहिलेलं आहे. गेल्या अडीच-तीन वर्षात कोरोना काळात झालेलं काम, मुंबईतील पूरस्थिती, रस्ते नियोजन, मेट्रो, गटारं, नाले असे विषय निवडणुकीचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. शिवाय महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पहिल्यादाच मुंबई पालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीचा वेगळंच महत्त्व आणि वलय प्राप्त झालंय.