Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ व्यक्तीच्या अटकेने ईव्हीएम घोटाळ्यावर शिक्कामोर्तब झालंय!; सामनातून भाजपवर टीका

Saamana Editorial on PM Narendra Modi : 'त्या' व्यक्तीची अटक, कथित ईव्हीएम घोटाळा अन् मोदी सरकारचा कारभार; सामनातून घणाघात. म्हणाले, 'त्या' व्यक्तीच्या अटकेने ईव्हीएम घोटाळ्यावर शिक्कामोर्तब झालंय! वाचा...

'त्या' व्यक्तीच्या अटकेने ईव्हीएम घोटाळ्यावर शिक्कामोर्तब झालंय!; सामनातून भाजपवर टीका
Follow us
| Updated on: Aug 26, 2023 | 8:18 AM

मुंबई | 26 ऑगस्ट 2023 : 2014 पासून निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळत आहे. पण या यशामागे ईव्हीएममधील सेटिंग कारणीभूत आहे, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यावरच आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. तसंच बोलोंग संगमा यांच्या अटकेचाही दाखला देण्यात आला आहे. बोलोंग संगमा यांची अटक म्हणजे ईव्हीएम घोटाळ्यावर शिक्कामोर्तब असल्याचं सामनात म्हणण्यात आलं आहे.

सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा

भारतात निवडणूक प्रक्रियेवरच संशयाचे सावट आहे. मेघालयातील बोलोंग संगमा या तरुणास नुकतीच अटक झाली. का? तर ‘ईव्हीएम’मध्ये सेटिंग करून प्रत्येक मत फक्त भाजपलाच कसे जाते याबाबतचा एक व्हिडीओ तयार करून त्याने प्रसारित केला.

‘ईव्हीएम’द्वारे घेतलेल्या निवडणुकांत घोटाळाच घोटाळा असल्याचे त्याने सिद्ध करताच त्या भारतीय नागरिकास अटक केली. प्रश्न इतकाच आहे की, आता भाजपचेच खासदार डी. अरविंद कुमार यांनीही तेच सत्य सांगितले! त्यांचे हे सत्यकथन म्हणजे ‘ईव्हीएम’ घोटाळ्यावर शिक्काच आहे! मग आता काय करणार? अरविंद कुमारना ‘ईव्हीएम’ घोटाळय़ाचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनवा. त्यांनी सत्य, सत्य आणि सत्य सांगितले आहे.

‘सत्यमेव जयते’ हेच आपल्या देशाचे बोधवाक्य आहे. सत्य कितीही दडपण्याचा प्रयत्न केला तरी ते लाव्हय़ाप्रमाणे उसळून वर येतेच. भाजपच्या वॉशिंग मशीनमधील मोदी साबणाची चर्चा जगभर सुरू आहे. त्यात भर घातली आहे ती भाजपचेच खासदार डी. अरविंद यांनी. त्यांनी बेशकपणे, निर्भयपणे सांगितले की, ”मतदारहो, तुम्ही कोणतेही बटन दाबा, मत भाजपलाच जाणार. आएगा तो मोदी ही…” याचा सरळ अर्थ असा की, भाजप ‘ईव्हीएम’ घोटाळा करून लोकसभा निवडणुका जिंकत आहे.

‘ईव्हीएम’ हॅक करून विजय संपादन करणे हेच भाजपचे सूत्र असल्याचे भाजपचे खासदार सांगत असतील तर भारताचा निवडणूक आयोग यावर काय पावले उचलणार आहे? खरे तर निवडणूक आयोगाकडूनही आता कोणत्याच अपेक्षा ठेवता येणार नाहीत. कारण ‘ईव्हीएम’बरोबर सत्तापक्षाने निवडणूक आयोगालाच ‘हॅक’ केले आहे. निवडणूक आयोग आता निष्पक्ष राहिलेला नाही. भाजपच्या पेंद्रीय सरकारचा तो हरकाम्या बनला आहे.

निवडणूक आयोगात ‘गुजरात मॉडेल’चे अधिकारी आणून त्यांच्याकडून हवी ती बरी-वाईट कामे करून घेतली जातात. महाराष्ट्रात ज्या प्रकारे शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाच्या हातात दिले, त्यामुळे या मनमानीवर शिक्कामोर्तब झाले.

भाजपचे मुलुंडकर नागडे पोपटलालही ‘ईव्हीएम’ घोटाळय़ावर तेव्हा आंदोलन करीत होते, पण 2014 साली सत्ता येताच या मंडळींनी ‘ईव्हीएम’ची पूजा व उत्सव सुरू केला. ‘ईव्हीएम है तो मोदी ही आयेगा’ यावर मोहोर उठवून देशभरातील अंधभक्तांनी ‘ईव्हीएम चालिसा’चे पठण सुरू केले. जगातील अमेरिका, युरोप, जपान, जर्मनी, बांगलादेश, फ्रान्ससारख्या राष्ट्रांनी तेथील निवडणूक प्रक्रियेतून ‘ईव्हीएम’ पद्धत मोडीत काढली.

‘ईव्हीएम’ विश्वासार्ह व समाधानकारक नाही हे सिद्ध झाल्यावरच हा निर्णय घेतला, पण विश्वासार्ह नसलेल्या ‘ईव्हीएम’ जनतेचा विश्वास गमावलेल्या मोदी सरकारने सुरूच ठेवल्या. हेच खरे गौडबंगाल आहे व हा भंगार माल का वापरला जातोय ते भाजपचेच खासदार डी. अरविंद यांनी आता स्पष्ट केले.

जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की..
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की...
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू.
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी.
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.