‘राज’ सिनेमातील भूत आठवतेय? 23 वर्षांनी कॅमेरासमोर येताच झटक्यात वाढले फॉलोअर्स, खचाखच भरला इनबॉक्स
'राज' सिनेमात भूताची भूमिका साकारणारी अभिनेत्री तब्बल 23 वर्षांनी समोर आल्या... इतक्या वर्षानंतर कॅमेऱ्या समोर आल्यानंतर एक झटक्यात तिच्या फॉलोअर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सध्या अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून लाईमलाईटपासून दूर राहिल्यानंतर काही सेलिब्रिटी अचानक समोर आले आणि सर्वत्र त्यांचीच चर्चा सुरु झाली. आता देखील एका अभिनेत्रीसोबत असंच काही घडलं आहे. अभिनेत्री दिपाशा बासू आणि अभिनेता डिनो मोरिया स्टारर ‘राज’ सिनेमात अभिनेत्री मालिनी शर्मा एका भूताच्या रुपात झळकली. प्रसिद्धीझोतात आल्यानंतर अचानक गायब झालेली शालिनी आता 23 वर्षांनंतर कॅमेऱ्यासमोर आली आहे. शालिनी आता झगमगत्या विश्वापासून दूर पुण्यात सह्याद्रीच्या डोंगरांवर एक होमस्टे चालवते. होमस्टे सोशल मीडियावर व्हायरल होताच, अभिनेत्रीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फॉलोर्स झटक्यात वाढले आहेत.
सोशल मीडियावरील फॉलोअर्सची संख्या वाढताच अभिनेत्रीने सर्वांचे आभार मानले आहे. शालिनी म्हणते, ‘कधी विचार देखील केला नव्हता की, इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रेम मिळेल आणि एका रात्रीत एवढे फॉलोअर्स वाढतील..’ आता यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर मिळालेल्या प्रेमाला प्रतिसाद म्हणून मालिनी शर्मा हिने देखील एक व्हिडिओ शेअर करून कृतज्ञता व्यक्त केली.
View this post on Instagram
पोस्ट शेअर करत शालिनी म्हणाते, ‘तुम्ही सर्वांनी कमाल केली आहे. मी या क्षणाची बिलकूल अपेक्षा देखील केली नव्हती… यासाठी मी तुमची आभारी आहे. मी खरंच भावूक झाली आहे. खरं सांगायचं झालं तर, व्यक्त होण्यासाठी माझ्याकडे कोणते शब्दच नाही. माझी फक्त एकच विनंती आहे की, आमचं फार्मस्टे फार लहान आहे.’
पुढे शालिनी म्हणते, ‘फार्मस्टे’च्या फोन क्रमांकावर इतक्या मोठ्या संख्येने येणारे फोन कॉल्स हाताळणं शक्य नाही. त्यामुळे, माझी विनंती आहे की ‘फार्मस्टे’च्या बुकिंगसाठी तुम्ही त्या क्रमांकावर फक्त व्हॉट्सॲप मेसेज करावा. तुम्ही मला इन्स्टाग्रामवरही मेसेज करत आहात आणि तेही फार मोठ्या संख्येने. मी स्लो लोकल असल्याने तुम्हाला उत्तर द्यायला देखील मला वेळ लागेल… त्यामुळे कृपया गैरसमज करुन घेऊ नका…’, असं देखील अभिनेत्री म्हणाली,
एका रात्रीत वाढले फॉलोअर्स
मालिनी शर्मा हिला केवळ सोशल मीडियावरंत प्रेम मिळालं नाही, तर तिच्या फॉलोअर्सच्या संख्येतही एका रात्रीत मोठी वाढ झाली. जेव्हा तिचा व्हिडिओ व्हायरल झाला, तेव्हा या अभिनेत्रीचे केवळ 644 फॉलोअर्स होते; आता त्यांची संख्या 268 हजारांच्यावर पोहोचला आहे.
