AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिलक वर्माच्या शतकाने मुंबईकर खेळाडूचे टेन्शन वाढवले, आता भारतीय संघातून कट होणार पत्ता

युवा भारतीय क्रिकेटपटू तिलक वर्माने दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात शानदार शतक झळकावले. तिलकच्या शतकी खेळीमुळे आता मुंबईकरला धडकी भरली आहे.

तिलक वर्माच्या शतकाने मुंबईकर खेळाडूचे टेन्शन वाढवले, आता भारतीय संघातून कट होणार पत्ता
| Updated on: Sep 01, 2026 | 1:07 PM
Share

Tilak Verma Century: युवा भारतीय क्रिकेटपटू तिलक वर्माने दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात शानदार शतक झळकावले. दक्षिण विभागाचा कर्णधार असलेल्या तिलकने उत्तर विभागाविरुद्ध दुसऱ्या दिवशी नाबाद १०६ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे दिवसाचा खेळ संपताना दक्षिण विभागाला ९० धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. २३ वर्षीय तिलकचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे आठवे शतक होते. या खेळीसह त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १६०० धावा पूर्ण केल्या. हा त्याचा २४ वा प्रथम श्रेणी सामना होता.

तिलकची कर्णधारपदाची खेळी अशा वेळी आली, जेव्हा दक्षिण विभागाने ८० धावांत पाच गडी गमावले होते. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन तिलकने एक बाजू इतकी भक्कमपणे सांभाळली की दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्याला कोणीही बाद करू शकले नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताना तिलक २२५ चेंडूंमध्ये १०६ धावांवर नाबाद राहिला. त्याच्या खेळीमुळे नॉर्थ झोनच्या १९५ धावांच्या प्रत्युत्तरात साऊथ झोनने ९ गडी गमावून २८५ धावांपर्यंत मजल मारली.

गोलंदाजांनी नॉर्थ झोनला १९५ धावांवर गुंडाळले, पण जेव्हा साऊथ झोन फलंदाजीसाठी आला, तेव्हा निम्मा संघ फक्त ८० धावांवर बाद झाला होता. नॉर्थ झोनच्या धावसंख्येची बरोबरी करणेही पुरेसे ठरेल असे वाटत होते, पण तिलकच्या शतकाने साऊथ झोनचा डाव केवळ सावरलाच नाही, तर त्यांना आघाडीही मिळवून दिली. तिलकने श्रेयस गोपालसोबत सहाव्या विकेटसाठी १७५ धावांची भागीदारी केली. मात्र, शतकाच्या जवळ पोहोचलेला श्रेयस ८८ धावांवर अर्शदीप सिंगच्या हाती झेलबाद झाला. त्याने आपल्या खेळीत ११ चौकार मारले. ३९/२ अशा स्थितीत फलंदाजीला आलेला तिलक दिवसाचा खेळ संपला तेव्हा नाबाद राहिला. त्याने ७ चौकारांच्या मदतीने १०६ धावांवर नाबाद राहिला. दक्षिण विभाग तिसऱ्या दिवशी शेवटच्या विकेटसाठी शक्य तितक्या धावा जोडून आपली आघाडी १०० धावांच्या पुढे नेण्याची आशा बाळगेल.

तिलकच्या खेळीमुळे आता भारतीय टी-२० संघा व्यतिरिक्तही तो आता इतर फॉरमेटमध्ये स्थान मिळवू शकतो अशी चर्चा सुरु आहे. आधीच तिलक श्रेयस अय्यरची जागा घेईल अशी चर्चा सुरु होती त्यात शतकी खेळी ठोकली, आता यामुळे वनडे संघाचं गणितही पूर्णपणे बदलणार असल्याचे दिसत आहे. तिलकच्या खेळीमुळे श्रेयस अय्यरच्या अडचणीत वाढ होणार आहे हे स्पष्टपणे दिसत आहे. वनडे संघात तिलक लवकरच आपली जागा निर्माण करेल ही शक्यता नाकारु शकत नाही.

Follow Us
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला