‘भाजपनं बिहारमध्ये जनाची आणि मनाचीही बाळगावी’!, दसरा मेळाव्यावरील विरोधकांच्या टीकेला राऊतांचं जोरदार प्रत्युत्तर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आहेत. यावेळी शिवसेनेचे मोजकेच पदाधिकारी, आमदार आणि खासदार उपस्थित असतील.

'भाजपनं बिहारमध्ये जनाची आणि मनाचीही बाळगावी'!, दसरा मेळाव्यावरील विरोधकांच्या टीकेला राऊतांचं जोरदार प्रत्युत्तर
sanjay raut uddhav thackeray narendra modi

मुंबई: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला यंदा अनन्यसाधारण महत्व आहे. कारण यावर्षी फक्त शिवसेना पक्षप्रमुख नाही तर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडणार आहे, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेळावा घेत आहात, जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा अशी टीका विरोधकांनी केली आहे. त्याला जोरदार प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी जनाची आणि मनाची बाळगूनच दसरा मेळावा शिवतीर्थावर नाही तर सभागृहात घेत असल्याचं म्हटलंय. बिहार निवडणूक प्रचारात भाजप ५० हजार लाखाचे मेळावे घेत आहे त्याचं काय? असा सवालही यावेळी संजय राऊत यांनी विचारला आहे. (Sanjay Raut on Shivsena dasra melava and Devendra Fadnavis)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आहेत. कोरोना नसता तर आज शिवतीर्थावर शिवसैनिकांचा महापूर दिसला असता, असं संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना ठासून सांगितलं. यंदाच्या दसरा मेळाव्याला मोजक्याच लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. यामध्ये पक्षाचे काही पदाधिकारी आणि मुंबईतील शिवसेनेचे आमदार यांचा समावेश असल्याचं राऊत म्हणाले.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर विरोधकांकडून टीका सुरु आहे. विरोधकांच्या टीकेला राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. बिहार निवडणूक प्रचारात भाजप काय करत आहे? तिथे ५० हजार, लाखाचे मेळावे होत आहेत. तिथे भाजपनं जनाची आणि मनाची लाज बाळगावी. इकडे नागपुरातही सरसंघचालकांनी मेळावा घेतला. सरसंघचालक आम्हाला आदर्श आहेत. पण तिथे विरोधक काय म्हणतील?, अशा शब्दात राऊत यांनी भाजपला प्रश्न विचारला आहे.

फडणवीसांना कोरोना, मुख्यमंत्र्यांकडून रुग्णालयाला सूचना

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते उपचारासाठी सेंट जॉर्ज या शासकीय रुग्णालयात दाखल झाले आहेत. फडणवीस कोरोनाच्या संकटातून लवकर बाहेर पडावेत यासाठी शिवसेना तुळजाभवानी चरणी प्रार्थना करत असल्याचं राऊत म्हणाले. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयाला फोन करुन योग्य त्या सूचना दिल्या आहेत. फडणवीस लवकर बरे होऊन बाहेर पडतील यासाठी सरकार काळजी घेत असल्याचंही राऊतांनी आवर्जुन सांगितलं.

संबंधित बातम्या: 

शिवसेनेचा दसरा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात, 50 जणांच्या उपस्थितीत सोहळा

Devendra Fadnavis Corona | देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाचा संसर्ग

Sanjay Raut on Shivsena dasra melava and Devendra Fadnavis

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI