AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Municipal Election Reservation : 14 महापालिका निवडणुकांसाठी महिला आरक्षण सोडत आज निघणार, जाणून घ्या महापालिका निहाय नियोजन?

आज राज्यातील महापालिकांची आरक्षण सोडत निघणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवारांसह संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे लागलं आहे. मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकांचा समावेश आहे.

Municipal Election Reservation : 14 महापालिका निवडणुकांसाठी महिला आरक्षण सोडत आज निघणार, जाणून घ्या महापालिका निहाय नियोजन?
14 महापालिकांसाठी आरक्षण सोडत आज जाहीर होणारImage Credit source: TV9
sagar joshi
sagar joshi | Updated on: May 31, 2022 | 6:45 AM
Share

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांचे (Municipal Elections) वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारविरुद्ध भाजप नेत्यांमध्ये जोरदार टीका आणि आरोप-प्रत्यारोप पहायला मिळत आहेत. राज्य निवडणूक आयोगाने 14 महापालिकांना 31 मेपर्यंत प्रभागनिहाय आरक्षण (Ward wise reservation) सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. अशावेळी आज राज्यातील महापालिकांची आरक्षण सोडत निघणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवारांसह संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे लागलं आहे. मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकांचा समावेश आहे.

अनुसुचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडत काढण्यासाठी सोबतच्या परिशिष्ट-ड (मराठी)व परिशिष्ट-इ इंग्रजीमधील नमुन्यात जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे. त्याआधी स्थानिक वर्तमानपत्रं, वेबसाईट, सूचना फलक इत्यादी 27 मेपर्यंत प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तर, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडत काढणे यासाठी 31 मे तारीख देण्यात आली होती.

मुंबई महापालिका

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी 31 मे रोजी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत जाहीर होणार आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सकाळी अकरा वाजता आरक्षणाची सोडत जाहीर केली जाणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. या सोडत प्रक्रियेवर सहा जूनपर्यंत सूचना आणि हरकती मांडता येणार आहेत.

ठाणे महापालिका

ठाणे महानगरपालिकेच्या सन 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अनुसूचित जाती ( महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता आरक्षण सोडत कार्यक्रम आज होणार आहे. सकाळी 11.00 वाजता ठाणे महापालिकेच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला आहे

नवी मुंबई महानगरपालिका

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 मध्ये अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) यासाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता आज सकाळी 10 वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे सोडत काढण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवड

आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला आणि सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षित जागांची सोडत आज होणार आहे. सोडतीनंतर प्रभागांचे आरक्षण 1 जून रोजी प्रसिद्ध केले जाईल. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत 46 प्रभाग, तर नगरसेवक संख्या 139 असणार आहे. 139 नगरसेवकांपैकी 69 पुरुष, तर 70 महिला नगरसेविका अशी वर्गवारी असेल. 139 नगरसेवकांपैकी 3 जागा अनुसूचित जमातीसाठी, तर 22 जागा अनुसूचित जातीसाठी राखीव असतील. ओबीसी आरक्षण मिळाले असते तर 38 जागा ओबीसींसाठी राखीव राहिल्या असत्या. आरक्षणाविना निवडणूक होण्याची शक्यता असल्याने ओबीसी प्रवर्गातून लढण्याची 38 जणांची संधी गेली आहे. त्यामुळे 114 जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूक होईल.

नागपूर महापालिका

-नागपूर महानगरपालिका निवडणूकीचा आखाडा रंगताना दिसून येत आहे. आज या महापालिकेतील आरक्षण सोडत होणार आहे. तर 13 जून ला प्रभागानुसार अंतिम आरक्षण जाहीर करण्यात येईल. ओबीसी आरक्षणाशिवाय महानगरपालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे. नागपूरात 52 प्रभागात 156 नगरसेवक असणार आहेत. तर महिलांसाठी 78 जागा आरक्षित असतील. अनुसुचीत जातीसाठी 31 तर अनुसुचीत जमातीसाठी 12 जागा राखीव असणार आहेत.

पुणे महापालिका

पुणे महापालिकेच्या 58 प्रभागातील 173 जागांसाठी आज अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला आरक्षणासाठी सोडत होणार आहे. या सोडतीमध्ये मागील टर्ममध्ये नगरसेवक राहिलेल्या 165 जणांपैकी कितीजणांना पुन्हा संधी मिळणार हे चित्र काही अंशी स्पष्ट होईल. पुणे महापालिका निवडणुकीसाठी आज गणेश कला क्रीडामंच इथे अनुसूचित जाती 23, अनुसूचित जमाती 2 आणि महिला आरक्षणाच्या एकूण 87 जागांसाठी सोडत होणार आहे. तर एकमेव असलेल्या प्रभाग क्र. 14 सुस बाणेर या द्विसदस्यीय प्रभागातील एका जागेवर महिला आरक्षण निश्चित आहे. महापालिका निवडणुकीसाठी आयोगाने पुणे शहराची 2011ची 35 लाख 56 हजार 824 इतकी लोकसंख्या गृहीत धरली आहे.

नाशिक महापालिका

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. अनुसूचित जाती, जमाती महिला आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित केलं जाणार आहे. या सोडतीचा कार्यक्रम सकाळी 10 वाजता भाभा नगरमधील दादासाहेब गायकवाड सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाचं ऑनलाईन प्रक्षेपणही होणार आहे.

Follow Us
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार