Nagpur MLC Election Result 2026: नागपूर पदवीधर मतदार संघात अजबच प्रकार, १५ हजार १०६ मतदान अवैध

Nagpur MLC Election Result 2026: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील एक अजब प्रकार समोर आला आहे. त्यामुळे १५ हजार १०६ मतदान अवैध ठरले आहे.

Nagpur MLC Election Result 2026: नागपूर पदवीधर मतदार संघात अजबच प्रकार, १५ हजार १०६ मतदान अवैध
sudhakar kohale
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 28, 2026 | 10:21 AM

राज्यात विधानपरिषदेतील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी सुरू आहे. काल पासून सुरु असलेल्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. नागपूर पदवीधर मतदार संघात तर हाय वोल्टेज ड्रामा पाहायाला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमग्राउंड असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात कोण गुलाल उधलणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, येथील एक अजब प्रकार समोर आला आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतमोजणी सुरू असताना एक अजब आणि चिंताजनक प्रकार समोर आला आहे. भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या नावासमोर अनेक मतदारांनी मतपत्रिकेवर केवळ ‘२’ हा आकडा लिहिल्याने मोठ्या प्रमाणात मते अवैध ठरली आहेत. या एकाच पॅटर्नमुळे सुमारे ४ ते ५ हजार मते रद्दबातल ठरल्याची माहिती समोर आली आहे.

Loading...

तब्बल १५ हजार १०६ मते अवैध

नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीत एकूण १ लाख ६५ हजार ५४१ मतदान झाले होते. यापैकी तब्बल १५ हजार १०६ मते अवैध ठरली आहेत. इतक्या मोठ्या संख्येने मते अवैध होणे हे पदवीधर मतदारसंघासाठी असामान्य मानले जात आहे. विशेषतः सुधाकर कोहळे यांच्या नावासमोर फक्त ‘२’ लिहिलेल्या मतपत्रिका मोठ्या संख्येने आढळल्यामुळे हे प्रमाण आणखी वाढले आहे. या अवैध मतांचा थेट परिणाम मतमोजणीच्या अंतिम निकालावर होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू असताना हा प्रकार आणखी चर्चेत आला आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत नितेश कराळे यांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीच्या मतांमध्ये अभिजीत वंजारी यांना जास्त मतं मिळतात की सुधाकर कोहळेंना यावरच नागपूर मतदार संघाचा निकाल अवलंबित राहण्याची शक्यता आहे. नितेश कराळे यांनी 24,249 मते घेतली असून त्यामध्ये कोहळे आणि वंजारी यांमध्ये कुणाच्या पारड्यात जास्त मतं पडतात यावरच विजयाचे गणित निर्भर राहणार आहे. सध्या दुसऱ्या पसंतीच्या मोजणीत 14 उमेदवार एलिमिनेट झाले असून सुधाकर कोहळे यांची पहिल्या पसंती मध्ये असलेली 4291 मतांची आघाडी काही प्रमाणात कमी झाली आहे. थोड्या वेळानंतर नितेश कराळे यांच्या 24 हजार 249 मतामध्ये दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू होईल. त्यामध्ये नितेश कराळे यांच्या मतामधील दुसरे पसंतीचे मत कोणाला बळ देतात? यावरच भाजप आणि काँग्रेसचे भवितव्य निश्चित होईल

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us