अंबानींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडणं हे भाजपचं षडयंत्र, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

सुरक्षेचे कारण पुढे करून अंबानी यांच्या हेलिपॅडला परवानगी मिळावी यासाठी भारतीय जनता पक्षानेच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले आहे", असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे (Nana Patole allegations on BJP). (Nana Patole allegations on BJP)

अंबानींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडणं हे भाजपचं षडयंत्र, नाना पटोलेंचा गंभीर आरोप
nana patole

मुंबई : “उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरावर हेलिपॅड आहे. पण त्याच्या वापरास परवानगी मिळत नाही. तसेच शेतकरी आंदोलनामुळे मुकेश अंबानींच्या कंपन्यांचे शेअर्स बाजारात घसरत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यातून सहानुभूती मिळावी आणि सुरक्षेचे कारण पुढे करून हेलिपॅडलाही परवानगी मिळावी यासाठी भारतीय जनता पक्षानेच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले आहे”, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे (Nana Patole allegations on BJP).

‘2009 मध्ये अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड’

“अंबानी यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर जिलेटिनच्या काड्या असलेली गाडी सापडली. अंबानी यांना केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच त्यांची वैयक्तीक सुरक्षा व्यवस्था असताना ती गाडी तिथपर्यंत पोहचलीच कशी? हा प्रश्न आहे. 2009 मध्ये अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड करून घातपात करण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणात ज्याचे नाव समोर आले त्याचा मृत्यू दुसऱ्याच दिवशी झाला होता”, याची आठवणही पटोले यांनी करून दिली.

‘भाजपने अधिवेशनाचा वेळा वाया घालवला’

“राज्यात आणि देशात असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होऊ नये म्हणून भाजपनेच या मुद्यावर गोंधळ घालून अधिवेशनाचा वेळ वाया घालवला”, असाही घणाघात पटोले यांनी केला (Nana Patole allegations on BJP).

नेमकं प्रकरण काय?

दरम्याम, एक मार्च रोजी सुरु झालेले राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सांगता झाली. या अधिवेशनात मनसूख हिरेन मृत्यू प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षात चांगलीच खडाजंगी बघायला मिळाली. काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेशी अंबानी यांच्या घराबाहेर स्पोटकांनी भरलेली गाडी आढळली होती. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत सापडला. त्यानंतर या प्रकरणात बऱ्याच घडामोडी घडत गेल्या. याच प्रकरणावरुन विधानसभेत गरमागरमीचे वातावरण बघायला मिळालं.

Published On - 10:16 pm, Wed, 10 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI