‘वेदांता प्रकल्प गुजरातला का हलवला? पटोले म्हणतात शिंदे, फडणवीस सरकार…
वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आला आहे. यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
वेदांता प्रकल्प (Vedanta project) महाराष्ट्रातून (Maharashtra) गुजरातला (Gujarat)हलवण्यात आला आहे. यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वेदांताच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्रात गुजरातचे सरकार आहे, त्यांची मर्जी सांभाळण्यासाठी शिंदे, फडणवीस सरकारने प्रकल्प गुजरातला हलवल्याचे पटोले यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी एकनात शिंदे यांना देखील टोला लगावला आहे. शिंदे स्वता: च मान्य करतात की ते पंतप्रधान मोदींचे हस्तक आहेत. ते जनतेचे हस्तक म्हणून काम करत नाहीत असं पटोले यांनी म्हटलं आहे. तसेच नाणार प्रकल्पा शेजारी गुजराती व्यापाऱ्याने जमीन खरेदी केली होती असा गौप्यस्फोटही पटोले यांनी केला आहे.
Published on: Sep 15, 2022 12:47 PM
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब

