माझे नाव अमजद खान का? नाना पटोलेंचा सवाल, नेत्यांना मुस्लिम नावं देत फोन टॅपिंग का केली? उत्तर मिळेल?

| Updated on: Mar 14, 2022 | 9:37 PM

फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्या प्रकरणात नाना पटोले यांचं नाव अमजद खान ठेवण्यात आल्याचं वळसे-पाटलांनी सांगितलं. त्यानंतर मी कुणाची जात काढत नाही. पण मला अमजद खान का देण्यात आलं? असा सवाल पटोले यांनी केलाय.

माझे नाव अमजद खान का? नाना पटोलेंचा सवाल, नेत्यांना मुस्लिम नावं देत फोन टॅपिंग का केली? उत्तर मिळेल?
नाना पटोले, देवेंद्र फडणवीस
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज सभागृहात दुसरा बॉम्ब टाकलाय! वक्फ बोर्डाशी (Waqf Board) संबंधित ऑडिओ क्लिपचा एक पेन ड्राईव्ह फडणवीस यांनी आज विधानसभा अध्यक्षांकडे दिलाय. तत्पूर्वी फडणवीस यांनी राज्य सरकार विशेष सरकारी वकिलांना हाताशी धरुन विरोधकांविरोधात षडयंत्र रचत असल्याचा आरोप केला होता. त्याचाही एक पेनड्राईन फडणवीस यांनी अध्यक्षांकडे दिला आहे. फडणवीसांच्या या आरोपांना उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्या प्रकरणात नाना पटोले (Nana Patole) यांचं नाव अमजद खान ठेवण्यात आल्याचं वळसे-पाटलांनी सांगितलं. त्यानंतर मी कुणाची जात काढत नाही. पण मला अमजद खान का देण्यात आलं? असा सवाल पटोले यांनी केलाय.

नाना पटोले यांनी भाजपवर टीका करताना राज्याच्या राजकारणाला काळीमा फासण्याचा प्रकार सुरु आहे. राज्याच्या हितासाठी सर्व आमदारांना निवडून पाठवतात. पण लोकप्रतिनिधींना बदनाम करण्याचं काम फडणवीसांच्या काळात झालं असेल तर त्याचं उत्तर फडणवीस यांनी द्यायला हवं, असं म्हटलंय. त्याचबरोबर हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याची भाजपची परंपरा राहिलेली आहे. त्यामुळे अशी नावे देऊन फोन टॅप केले. मी कुणाची जात काढणार नाही. पण माझे नाव अमजद खान असे का देण्यात आले? असा सावल करत त्याचं उत्तर आपल्याला हवं असल्याचंही पटोले म्हणाले.

नाना पटोलेंचं नाव ‘अमजद खान’ तर बच्चू कडूंचं ‘निजामुद्दीन शेख’!

फोन टॅपिंग प्रकरणाची माहिती देताना वळसे-पाटील यांनी सांगितलं की, 2015 ते 2019 या काळातील फोन टॅपिंगच्या संदर्भात पडताळणी करण्यासाठी शासनानं 9 सप्टेंबर 2019 ला आदेश काढला. पोलीस संचालक महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली समिती केली. सदर उच्चस्तरिय समितीला 15 ते 19 या काळातील फोन टॅपिंगचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले होते. तो अहवाल त्यांनी दिला आणि तो राज्य सरकारनं स्वीकारला. त्या अहवालातून पुढे काय आलं तर 2017 ते 2018 या काळात पुणे शहरात आयुक्त असलेल्या रश्मी शुक्ला यांनी 4 लोकप्रतिनिधींचे 6 भ्रमणध्वनी टॅप केले. त्यात नाना पटोले यांचं नाव काय ठेवलं होतं तर अमजद खान. बच्चू कडू यांचं नाव ठेवलं होतं निजामुद्दीन बाबू शेख. संजय काकडे हे तर त्यावेळी भाजपचे खासदार होते. त्यांचं नाव ठेवलं होतं तरबेज सुतार. आशिष देशमुख त्यावेळी भाजपचेच आमदार होते, त्यांच नाव ठेवलं होतं रघू चोरगे. आशिष देशमुखांचा दुसरा फोन, त्यांचं नाव ठेवलं हिना महेश साळुंके!… या अहवालात रश्मी शुक्ला यांच्याबद्दल गंभीर बाबी नमूद करण्यात आल्याचंही यावेळी वळसे-पाटील यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

प्रवीण चव्हाण यांनी वकीलपत्राचा राजीनामा दिला, पेन ड्राईव्ह प्रकरणाचा तपास सीआयडीला सोपवणार; दिलीप वळसे-पाटील यांची घोषणा

‘पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच’, नाना पटोलेंचं ट्वीट! 2024 ला सर्वाधिक जागा जिंकण्याचाही दावा