VIDEO: उद्धव ठाकरे रडत लक्ष्मी, अनिल परब सेवाभावी मंत्री; नारायण राणेंनी तोफ डागली

| Updated on: Apr 16, 2021 | 1:58 PM

भाजपचे नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. (narayan rane attacks cm uddhav thackeray over maharashtra curfew)

VIDEO: उद्धव ठाकरे रडत लक्ष्मी, अनिल परब सेवाभावी मंत्री; नारायण राणेंनी तोफ डागली
नारायण राणे, भाजप नेते
Follow us on

मुंबई: भाजपचे नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रडत लक्ष्मी आहेत. तर अनिल परब हे सेवाभावी आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. (narayan rane attacks cm uddhav thackeray over maharashtra curfew)

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारने लागू केलेल्या संचारबंदीवर टीका केली आहे. संचारबंदीच्या निर्णयाने राज्यातील जनता समाधान होणार आहे का? त्यामुळे त्यांचं पालनपोषण होणार आहे का? दीड हजारात लोकांचं पोट कसं भरणार? राज्यातील कामगार उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. राज्यातील कोरोना बळींची वाढती संख्या हे उद्धव ठाकरे सरकारचं पाप आणि अपयश आहे, अशी टीका त्यांनी केली. दुकाने बंद करायची तर जीएसटी का आकारली जातेय? दुकानदारांना नोटीस का पाठवत आहात? असा सवाल त्यांनी केला.

पैसा कुणी कुठे पोहोचवला, चौकशी व्हावी

अनिल परब हे सेवाभावी मंत्री आहेत. जमा करण्याचं आणि आणून द्यायचं काहीही कमिशन न घेता. म्हणून त्यांची चौकशी करावी. सेवा आणि मेवा कसा जमा केला, कुठून नेऊन पोहोचवला याची चौकशी झाली पाहिजे, असं ते म्हणाले. दीड हजार घ्या, पाचशे घ्या. शंभर घेऊन जा. हे काय आहे. चेष्टा आहे लोकांची. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा असू शकतो, रडत लक्ष्मी अशी टीकाही त्यांनी केली.

मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करता?

राज्य आहे, राज्याला स्वत:साठी लागणारा पैसा निर्माण करण्याचा अधिकार घटनेने दिलाय. त्यामुळे जरा संविधान वाचा. मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय राहता?, असा सवाल करतानाच माणसं मरत आहेत. 60 हजार लोकं मेलं आहेत. राज्य दिवाळखोरीकडे जात आहे. दीड हजार रुपये जाहीर करण्याचं काम क्लार्कचं आहे. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय देता? असा सवालही त्यांनी दिला.

नाचता येईना, अंगण वाकडे

राज्याचे अन्न व औषधी प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे जे सांगत आहेत ते नाचता येईना अंगण वाकडं आहे. रुग्णांच्या संख्येचा अंदाज घेता येत नाही का? अनेक देशात कोरोना थांबला आणि पुन्हा वाढला. त्यामुळे त्यांनी उपाययोजना केली. आज लंडनमध्ये सर्व सुरू आहे. शिंगणे काय सागंत आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलावं. त्यांनी मंत्र्यांना बळी देऊ नये, अशी टाकी त्यांनी केली. तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ किती जणांना पुरणार? पिंपात घालून वरून पाणी पिणार का? ही जनतेची चेष्टा आहे, असं सांगतानाच किती दिवस दुकाने बंद ठेवणार आहात? असा सवालही त्यांनी केला. (narayan rane attacks cm uddhav thackeray over maharashtra curfew)

संबंधित बातम्या:

नागपुरात आताच्या आता 30 ते 40 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज, शेकडो रुग्ण जीवन-मरणाच्या दारात!

नाना पटोलेंचा बॉम्ब, इंदापुरात जाऊन मंत्री दत्ता भरणे आणि अजित पवारांचं टेन्शन वाढवलं!

वर्षभरापूर्वी घडलेल्या घटनेसाठी रस्त्यावर उतरणं योग्य नाही; गृहमंत्र्यांचा भाजपला टोला

(narayan rane attacks cm uddhav thackeray over maharashtra curfew)