नारायण राणेंच्या अटकेविरोधात भाजपचे नेते राजभवनावर दाखल, राज्यपाल काय भूमिका घेणार?

भाजप आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुरु केलंय. अशावेळी मुंबईत भाजप नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला राजभवनावर दाखल झाले आहेत. भाजप नेते विनोद तावडे यांच्यासह काही नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहोचले आहेत.

नारायण राणेंच्या अटकेविरोधात भाजपचे नेते राजभवनावर दाखल, राज्यपाल काय भूमिका घेणार?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 5:03 PM

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध केलाय. तर दुसरीकडे भाजप आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुरु केलंय. अशावेळी मुंबईत भाजप नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला राजभवनावर दाखल झाले आहेत. भाजप नेते विनोद तावडे यांच्यासह काही नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहोचले आहेत. (BJP leader Vinod Tawde meets Governor Bhagat Singh Koshyari)

महाविकास आघाडी सरकार कशाप्रकारे दडपशाही करत आहे. केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांना प्रोटोकॉल न पाळता अटक करण्यात येत आहे, असा आरोप भाजप नेते करत आहेत. तसंच नारायण राणे यांचा रक्तदाब वाढला आहे. त्यांची शुगर लेवल आणि ईसीजी करता आला नाही, असं वैद्यकीय पथकानं म्हटलंय. त्यामुळे राणे यांची वैद्यकीय तपासणीतही अडथळे आणण्यात आल्याचा आरोप भाजपनं केलाय. या पार्श्वभूमीवर आता विनोद तावडे यांच्या नेतृत्वात भाजप नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. आता राज्यपाल कोश्यारी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे.

राणेंच्या जीवाला धोका, प्रसाद लाड यांचा आरोप

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी नारायण राणे यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आमदार प्रसाद लाड यांनी केलाय. इतकंच नाही तर राणे यांच्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोपही लाड यांनी केलाय. राणे जेवण करत असताना पोलिसांनी त्यांचं जेवणाचं ताट खेचण्याचा प्रयत्न केला. तसा एक व्हिडीओ आपण रेकॉर्ड केल्याचं लाड यांनी सांगितलं. इतकंच नाही तर लाड यांनी एक व्हिडीओही दाखवला आहे.

राणेंच्या जीवाला धोका, प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप

राणे यांना ताटकळत ठेवून कोर्टात हजर करायचं नाही आणि त्यांचा छळ करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राणे यांच्या जीवाला धोका आहे. आता एका मंत्र्याचा व्हिडीओ समोर आलाय. तो मंत्री फोनवरुन पोलीस अधीक्षकांना फोन करुन दबाव टाकताना दिसत आहे, असा आरोपही लाड यांनी केलाय. पोलिस राणेंसोबत ज्या पद्धतीने वागले त्याचा व्हिडीओ माझ्याकडे आहे. आमदार, खासदार, मंत्री बाजूला ठेवा. पण एका ज्येष्ठ नागरिकांला अशी वागणूक दिली जात आहे, जी चुकीची आहे. राणे यांची अद्याप अटक दाखवण्यात आलेली नाही. त्यांना ताटकळत ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझा स्पष्ट आरोप आहे की राणेंच्या जीवाला धोका आहे, असा गंभीर आरोप लाड यांनी केलाय.

संबंधित बातम्या :

राणेंचा बीपी वाढला, डॉक्टर म्हणतात, हॉस्पिटलमध्ये दाखल करणं गरजेचं

नारायण राणेंना संगमेश्वरमध्ये अटक; अटकेचा संपूर्ण घटनाक्रम एका क्लिकवर!

BJP leader Vinod Tawde meets Governor Bhagat Singh Koshyari

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.