नारायण राणेंना संगमेश्वरमध्ये अटक; अटकेचा संपूर्ण घटनाक्रम एका क्लिकवर!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावण्याची भाषा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंना भोवली आहे. कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर राणेंना अखेर रत्नागिरी पोलिसांनी अटक केली. (Narayan Rane)

नारायण राणेंना संगमेश्वरमध्ये अटक; अटकेचा संपूर्ण घटनाक्रम एका क्लिकवर!
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक


संगमेश्वर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावण्याची भाषा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंना भोवली आहे. कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर राणेंना अखेर रत्नागिरी पोलिसांनी अटक केली. दिवसभर हे अटक नाट्य आणि आरोप-प्रत्यारोप सुरू होते. नेमकं कधी काय झालं? यावर टाकलेला हा प्रकाश. (Union Minister Narayan Rane arrested by Maharashtra Police: Know all details)

राणे नेमंक काय म्हणाले होते?

राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हिरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हिरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.

जेवण केलं, औषधं घेतली, सव्वा तासानंतर अटक

राणे आज संगमेश्वरच्या गोळवली गावात आले होते. रत्नागिरी सत्र न्यायालयाने राणेंविरोधातील जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक आणि एसपी रत्नागिरीत आले. दुपारी 2.15च्या सुमारास राणे ज्या ठिकाणी थांबले होते तिथे पोलीस आले. पोलिसांनी राणेंना कागदपत्रं दाखवली आणि अटक करण्यात येत असल्याचं सांगितलं. राणे केंद्रीय मंत्री असल्याने राज शिष्टाचारानंतर सर्वसोपस्कार पार पडले. राणेंनी सर्व कागदपत्रे तपासली. त्यानंतर त्यांनी जेवण करून औषधे घेतली. यावेळी राणेंचा बीपी आणि शुगरचा त्रास वाढला. त्यामुळे सरकारी आणि खासगी डॉक्टरांनी घटनास्थळी दाखल होऊन राणेंची तपासणी केली. त्यानंतर सव्वा तासाने म्हणजे 3.30 वाजता राणेंना अटक केली.

अटक वॉरंटच नाही: जठार

राणे यांचा जामीन फेटाळल्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी रत्नागिरीचे एसपी राणेंकडे आले. त्यानंतर बराच वेळ राणेंनी कागदपत्रं तपासली त्यानंतर प्रमोद जठार यांनी मीडियाशी संवाद साधतानाच पोलिसांवर गंभीर आरोप केले. अटक करण्यासाठी एसपी आले. आम्ही अटक वॉरंट दाखवण्याची विनंती केल. पण आमच्यावर खूप दबाव आहे. खूप दबाव आहे… आम्हाला पाच मिनिटात राणेंना अटक करायला सांगितलं आहे असं एसपीने सांगितलं. पोलीस आम्हाला अटक वॉरंट दाखवत नाहीत. सदर गृहस्थ केंद्रीय मंत्री आहेत. त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घेतली पाहिजे. पण एसपी म्हणतात आमच्यावर दबाव आहे. आम्ही त्यांना म्हटलं अटक वॉरंटचा कागद दाखवा आम्ही गाडीत बसून पोलीस स्टेशनला येतो, असं भाजप नेते प्रमोद जठार म्हणाले.

राणे आज काय म्हणाले?

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही प्रतिक्रिया व्यक्त केली. पत्रकार परिषद घेण्यापूर्वी नारायण राणे यांनी त्यांचे वकील अॅड. संजय चिठणील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. मला तुम्हाला सांगायचं आहे, माहिती अभावी मी एकही उत्तर देणार नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झालाय याची माहिती मला नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. तुम्ही तपासून पाहा, मग आपआपल्या टीव्हीवर दाखवा, नायतर तुमच्याविरोधात माझी केस दाखल होईल. गुन्हा दाखल नसताना, उगाच अटक होणार वगैरे काय नॉर्मल माणूस वाटलो काय तुम्हाला?, असा सवाल राणे यांनी केला. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचं मला माहीत नाही. तुम्ही म्हणताय म्हणून मी मान्य करणार नाही. तुम्ही माहिती घ्या, असं सांगतानाच मी जे काही बोललो तो क्रिमिनल ऑफेन्स नाही, असं राणे म्हणाले.

त्या विधानाचं समर्थन करता काय?: पाटील

जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन नारायण राणेंच्या वक्तव्याचा निषेध करतानाच भाजपलाही काही सवाल केले. नारायण राणे यांच वक्तव्य निषेधार्य आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल ही भाषा वापरणे चुकीची आहे. राजकारणाचा स्तर खाली गेलाय असं नाही तर काही लोकांचा स्तर खाली गेलाय, असा टोला लगावतानाच महाराष्ट्रात शिवसेनेनं जबाबदारीनं वागायचं काम केलंय. कायदा कोणाला हाती घेऊ देणार नाही. राष्ट्रवादी याचं कसलंही समर्थन करणार नाही. गृहखात्याला याबाबत जास्त माहिती आहे. विधानाकडे बघितलं तर परिस्थिती समजू शकतो, असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले. राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेलं वक्तव्य चुकीचं आहे. अशी भाषा महाराष्ट्रात अशी भाषा कधीच कुणी वापरली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा मंत्र्याला कशाच्या आधारे मंत्रिमंडळात घेतले?, असा सवाल करतानाच राणेंच्या वक्तव्याला तुमचं समर्थन करत आहात काय?, असा सवाल पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.

मोदींना चोर म्हटलं गेलं त्याचं काय करायचं?: पाटील

केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्यात येत नाही. पहिल्यांदाच तुम्हाला बातमी देतोय. देशाच्या शिष्टाचारानुसार क्रम सांगायचा तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती , पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री यांना कोणतंही राज्य सरकार अटक करू शकत नाही. या सरकारचं गेल्या 20 महिन्यात काय चाललंय? कोण यांना सल्लागार मिळाला माहीत नाही. कोर्टात ते प्रत्येक विषयावर फटके खात आहेत. तसं आता खातील, असं सांगतानाच शिवसैनिकांनी केस दाखल करणं समजू शकतो. पण अटक? मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते तेव्हा पंढरपुरला मोदींना पंतप्रधान असताना चोर म्हणाले. त्याचं काय करायचं? मुख्यमंत्री असताना दसरा मेळाव्यात त्यांनी जे भाषण काढा. त्यावर किती केसेस दाखल करायच्या?, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

किती वाजता काय घडलं?

10.30: नाशिक पोलीस आयुक्त हा राष्ट्रपती की पंतप्रधान? आमचं पण सरकार वर आहे : नारायण राणे

10.54 : राणे म्हणाले, तुम्ही राष्ट्रपती की पंतप्रधान, आता नाशिक पोलीस आयुक्त म्हणतात, ते कोर्टात सांगा!

11.30 : तळकोकणातून पहिला हुंकार, नारायण राणेंची रॅली रोखण्याचा इशारा

11.43 : वरुण सरदेसाईंच्या नेतृत्त्वात युवा सेनेचा एल्गार, राणेंच्या घराबाहेर धुमश्चक्री

12.34 : नाशिक पोलिसांचा प्लॅन बदलला, राणेंना चिपळूणमध्ये अटक करणार नाही!

1.31 : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद, राणेंच्या वक्तव्याचं समर्थ नाही, पण त्यांच्या पाठी उभं राहण्याचं केलं स्पष्ट

2.04 : राणेंच्या जुहु बंगल्यासमोर युवासैनिक, शिवसैनिक आणि राणे समर्थक भिडले, चार शिवसैनिक जखमी

2.15 : राणेंना अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांकडे वॉरंटच नाही, प्रमोद जठार यांचा दावा

2.21 : नारायण राणे यांना अटक

3.40 : नारायण राणेंना संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेलं (Union Minister Narayan Rane arrested by Maharashtra Police: Know all details)

 

संबंधित बातम्या:

नारायण राणेंच्या वक्तव्याचा मुंबई पालिका निवडणुकीत भाजपला फटका बसणार? फडणवीसांचं थेट उत्तर

Narayan Rane Arrests : राणेंना पोलीस नाशिकला कोर्टात नेणार?, बंद खोलीत फक्त पोलीस आणि राणे, नेमकं काय घडलं?

उद्धव ठाकरे मोदींना ‘चोर’ म्हणाले, मग त्यांचं काय करायचं? पाटलांचा राणे प्रकरणावर प्रती सवाल

(Union Minister Narayan Rane arrested by Maharashtra Police: Know all details)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI