जो मंत्रालयात येऊ शकत नाही, तो मुख्यमंत्री हवाच कशाला? : नारायण राणे

जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसूच शकत नाही, तो कशाला हवा," असे अनेक प्रश्नही नारायण राणेंनी उपस्थितीत (Narayan Rane Criticizes CM Uddhav Thackeray Government) केले.

जो मंत्रालयात येऊ शकत नाही, तो मुख्यमंत्री हवाच कशाला? : नारायण राणे

मुंबई : “जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसू शकत नाही तो मुख्यमंत्री कशाला हवा, हा मुख्यमंत्री निष्क्रिय आहे,” अशी खरपूस टीका भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्देशून केली. “महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही, मंत्रालय नाही, सामान्य माणसाची कुणाला चिंता नाही. बदल्या कोण करतंय कळत नाही, ताळमेळ नाही, काय चाललंय काही समजत नाही,” असेही राणे यावेळी म्हणाले. (Narayan Rane Criticizes CM Uddhav Thackeray Government)

“हाकेच्या अंतरावर मंत्रालय आहे. पण मंत्रालयात मुख्यमंत्रीच नाही. त्यामुळे हे सरकार खरच अस्तित्वात आहे का, जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसूच शकत नाही, तो कशाला हवा,” असे अनेक प्रश्नही राणेंनी यावेळी विचारले.

“हा मुख्यमंत्री निष्क्रीय आहे. हा प्रशासन चालवू शकत नाही. जनतेची परिस्थिती थांबवू शकत नाही. महाराष्ट्राच्या जनतेसाठी हे सरकार घातक आहे. महाराष्ट्रात कोरोनाने असंख्य मृत्यू होत आहे. त्यामुळेच हे सरकार सत्तेत राहणे योग्य नाही. त्यासाठीच मी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती,” असेही राणे यावेळी म्हणाले.

“हा मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेरच पडत नाही, तो काय काम करणार, असेही नारायण राणे म्हणाले. असा मुख्यमंत्री कुठे सापडणार नाही आणि कुणी ठेवणार पण नाही. दयनीय अवस्था राज्याची असताना हा मुख्यमंत्री डोळे मिटून फक्त लॉकडाऊन करा एवढच बोलतोय,” असेही राणे म्हणाले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“कोरोनामुळे मुंबईत जवळपास ५ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. यावर सरकार खरच गंभीर आहे का ? मुंबई पोलीस दलातील 12 उपायुक्तांची दोन जुलैला बदली करण्यात आली होती. मात्र या बदल्यांना मुख्यमंत्री आणि गृह मंत्रालय कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे, यावरुनही नारायण राणेंनी सरकारवर टीका केली. बदली प्रकरणावर मात्र तात्काळ बैठका होतात. झालेल्या बदल्या तात्काळ रद्द होतात. या बदल्यांमागे कोणाचं काय सुरु आहे. कोणाला काय फायदा आहे हे जनेतला कळतयं,” असे नारायण राणे म्हणाले.

“गेल्या चार महिन्यात हे सरकार १० वर्ष मागे नेलं. अनेकांचे पगार होत नाही. निसर्ग चक्रीवादळ झालं, पण मुख्यमंत्र्यांनी केवळ घोषणा केल्या. पुढे काय झालं? राज्याला ना मुख्यमंत्री आहे ना मंत्रालय,” अशीही टीका राणेंनी केली.

“मुख्यमंत्र्यांना पंढरपूरच्या शासकीय महापुजेचा मान मिळाला. पण त्यांनी तिथे जाऊन काय केलं. हिंदू आहेत ना, मग विठोबाचं दर्शन केला का, मग तिकडे जाऊन काय केलं?” असेही नारायण राणे म्हणाले.

“हा वारकरी मंडळींचा अपमान आहे. तिथल्या शिवसैनिकांना मंदिराच्या जवळही येऊ दिलं नाही. एवढचं करायचं होतं तर एक मूर्ती मातोश्रीतच आणून ठेवा. तर त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे गरम होतं म्हणून गाडीत जाऊन बसले,” असे राणेंनी यावेळी म्हटलं. (Narayan Rane Criticizes CM Uddhav Thackeray Government)

संबंधित बातम्या :

विकास दुबे ‘नेपाळमधील दाऊद’ ठरु नये, यूपीतील गुंडशाहीवरुन ‘सामना’चा योगी सरकारवर हल्लाबोल

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *