AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर मुंबईत चालणं, बोलंण आणि फिरण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल, प्रभादेवी राड्यानंतर नारायण राणेंचा शिवसेनेला इशारा

काल प्रभादेवीमध्ये शिंदे गट आणि शिवसेनेच्या (Shiv Sena) कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं पहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे.

...तर मुंबईत चालणं, बोलंण आणि फिरण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल, प्रभादेवी राड्यानंतर नारायण राणेंचा शिवसेनेला इशारा
नारायण राणे, उद्धव ठाकरेImage Credit source: Google
| Updated on: Sep 12, 2022 | 2:37 PM
Share

मुंबई: काल प्रभादेवीमध्ये शिंदे गट आणि शिवसेनेच्या (Shiv Sena) कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हे देखील दाखल झाले. गुन्हे दाखल होताच शिवसेना आक्रमक झाली.  शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. आज या सर्व पार्श्वभूमीवर भाजप (BJP) नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान राणेंनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेनेकडे तक्रार करण्यापलीकडे फार काही उरलं नाही. ‘मातोश्री’च्या दुकानामध्ये बसून तक्रारीचं मार्केटिंग सुरू असल्याची खोचक टीका नारायण राणे यांनी केली आहे.

शिवसेनेला राणेंचा इशारा

पुढे बोलताना नारायण राणे यांनी म्हटलं आहे की, सदा सरवणकर हे आमचे मित्र आहेत. सध्या आमची युती आहे. मात्र युतीपेक्षाही ते आमचे मित्र आहेत, म्हणून त्यांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. असे हल्ले करू नका नाहीतर मुंबई आणि महाराष्ट्रात चालणं, बोलणं, फिरणं अवघ होईल त्यासाठी परवानगीची गरज लागेल, असा इशाराही नारायण राणे यांनी यावेळी शिवसेनेला दिला आहे.

गोळीबार झालाच नाही

दरम्यान शिवसेनेने साद सरवणकर यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. याबाबत नारायण राणे यांना विचारले असता, त्यांनी आरोप फेटाळून लावले. कमीत कमी बंदूकीच्या गोळीचा आवाज तरी आला असताना असं त्यांनी यावेळी म्हटलं.

शिवसेनेला शिंदे गटाची ताकत माहितीये

शिंदे गटाबाबत बोलताना नारायण राणे यांनी म्हटलं आहे की, शिंदे गटाची मुंबईमध्ये ताकत किती आहे? याचा अंदाज तर शिवसेनेला आलाच आहे. एकाचवेळी 40 आमदार फुटतात आणि डोळ्या देखत सत्तेत देखील सहभागी होतात मात्र तरी देखील ते काहीच करू शकत नाहीत असं राणे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?