कुठून लढायचं? तुमचा वॉर्ड कोणता? आरक्षण सोडत जाहीर; नाशिक, केडीएमसी, पनवेल आणि नवी मुंबईत काय स्थिती?

Municipal Corporation Election Reservation: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची बातमी आहे. आगामी नाशिक, कल्याण-डोंबिवली, पनवेल आणि नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे.

कुठून लढायचं? तुमचा वॉर्ड कोणता? आरक्षण सोडत जाहीर; नाशिक, केडीएमसी, पनवेल आणि नवी मुंबईत काय स्थिती?
Municipal Corporation Election Reservation
| Updated on: Nov 11, 2025 | 4:43 PM

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची बातमी आहे. आगामी नाशिक, कल्याण-डोंबिवली, पनवेल आणि नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. त्यामुळे आता कोणत्या वॉर्डमध्ये कोणत्या प्रवर्गाचा उमेदवार असेल हे समोर आले आहे. यामुळे आता उमेदवारांनाही तयारीला वेळ मिळणार आहे. नाशिक, कल्याण-डोंबिवली, पनवेल आणि नवी मुंबई महापालिकेचा कोणता वॉर्ड कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नाशिक महानगरपालिका आरक्षण

पंचवटी विभाग
1)
अ – अनुसूचित जाती महिला
ब – अनुसूचित जमाती
क – ओबीसी महिला
ड – सर्वसाधारण

2)
अ – अनुसूचित जाती महिला
ब – अनुसूचित जमाती महिला
क – ओबीसी
ड – सर्वसाधारण

3)
अ – ओबीसी महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण
ड – सर्वसाधारण

4)
अ – अनुसूचित जाती महिला
ब – अनुसूचित जमाती महिला
क – ओबीसी
ड – सर्वसाधारण

5)
अ – ओबीसी
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

6)
अ – अनुसूचित जमाती महिला
ब – ओबीसी
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

पश्चिम विभाग
7)
अ – ओबीसी
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

12)
अ – अनुसूचित जाती
ब – ओबीसी महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

13)
अ – ओबीसी महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण
ड – सर्वसाधारण

सातपूर विभाग
8)
अ – अनुसूचित जाती महिला
ब – अनुसूचित जमाती
क – ओबीसी महिला
ड – सर्वसाधारण

9)
अ – अनुसूचित जाती महिला
ब – ओबीसी
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

10)
अ – ओबीसी
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

11)
अ – अनुसूचित जाती
ब – अनुसूचित जमाती महिला
क – ओबीसी महिला
ड – सर्वसाधारण

26)
अ – ओबीसी
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

पूर्व विभाग

14)
अ – अनुसूचित जाती
ब – ओबीसी महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

15)
अ – ओबीसी
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

16)
अ – अनुसूचित जाती
ब – अनुसूचित जमाती
क – ओबीसी महिला
ड – सर्वसाधारण महिला

23)
अ – अनुसूचित जमाती महिला
ब – ओबीसी महिला
क – सर्वसाधारण
ड – सर्वसाधारण

30)
अ – अनुसूचित जाती
ब – ओबीसी महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

नाशिकरोड विभाग
17)
अ – अनुसूचित जाती
ब – ओबीसी महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

18)
अ – अनुसूचित जाती
ब – ओबीसी महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

19)
अ – अनुसुचित जाती महिला
ब – ओबीसी
क – सर्वसाधारण महिला

20)
अ – अनुसूचित जाती
ब – ओबीसी महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

21)
अ – अनुसूचित जाती महिला
ब – ओबीसी
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

22)
अ – अनुसूचित जाती महिला
ब – ओबीसी
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

सिडको विभाग

24)
अ – ओबीसी महिला
ब – ओबीसी
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

25)
अ – ओबीसी
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

27)
अ – अनुसूचित जाती महिला
ब – अनुसूचित जमाती
क – ओबीसी महिला
ड – सर्वसाधारण

28)
अ – ओबीसी
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

29)
अ – ओबीसी
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

31)
अ – अनुसूचित जाती
ब – ओबीसी महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

पनवेल महानगरपालिका आरक्षण

पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 ची आरक्षण सोडत जाहीर झाली. 20 प्रभागातील ७८ सदस्य निवडीसाठी आज आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर झाला. यामध्ये 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. सहा जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत, यातील तीन जागा महिलांसाठी असणार आहे. तर अनुसूचित जमातीसाठी आलेल्या दोन जागांपैकी एक जागा ही अनुसूचित महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे .

नवी मुबंई महानगरपालिकेतील आरक्षण

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत एकूण 28 प्रभाग असून त्यापैकी 27 प्रभाग हे चार सदस्यीय असून एक प्रभाग क्रमांक 28 हा तीन सदस्यीय असणार आहे. या 28 प्रभागातून एकूण 111 सदस्य निवडले जाणार आहेत. यापैकी, अनुसूचित जाती 10 जागांपैकी महिलांसाठी 5 प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत. अनुसूचित जमातीसाठी 2 जागा असून 1 जागा महिलेसाठी राखीव असेल. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 29 जागा असून यातील 15 जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 70 जागा आहेत, यातील 35 जागा महिलांसाठी असणार आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील आरक्षण

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 2025 -2026 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. एकूण 122 सदस्यीय प्रभागांसाठी ही सोडत काढण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत चार सदस्यीय 29 प्रभाग आणि तीन सदस्यीय 2 प्रभाग असणार आहे. या सर्व प्रभागांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे.

प्रवर्गानुसार आरक्षण

  • अनुसूचित जाती (SC): 12 प्रभाग (6 प्रभाग महिलांसाठी आरक्षित)
  • अनुसूचित जमाती (ST): 3 प्रभाग (2 प्रभाग महिलांसाठी आरक्षित)
  • इतर मागासवर्गीय (OBC): 38 प्रभाग (16 प्रभाग महिलांसाठी आरक्षित)
  • सर्वसाधारण प्रवर्ग: 75 प्रभाग (38 प्रभाग महिलांसाठी राखीव)