Nasik nmc election 2022, Ward 14 : राष्ट्रवादी की भाजप?; प्रभाग क्रमांक 14वर सर्वांच्या नजरा!

Nasik nmc election 2022, Ward 14 : मागच्या वेळी चार वॉर्डांचा एक प्रभाग होता. आता तीन वॉर्डाचा एक प्रभाग आहे. त्यामुळे यावेळी मागच्यावेळी जिंकून आलेल्या फारच कमी नगरसेवकांना लढण्यासाठी संधी मिळणार आहे. प्रभाग क्रमांक 14 अ हा वॉर्ड अनुसूचित जाती महिलासाठी राखीव झाला आहे.

Nasik nmc election 2022, Ward 14 : राष्ट्रवादी की भाजप?; प्रभाग क्रमांक 14वर सर्वांच्या नजरा!
राष्ट्रवादी की भाजप?; प्रभाग क्रमांक 14वर सर्वांच्या नजरा!Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 8:15 AM

नाशिक: नाशिक (Nasik) महापालिकेच्या 2017च्या निवडणुकीत (nmc election 2022) प्रभाग 13 वर भाजपचं वर्चस्व होतं. तर प्रभाग क्रमांक 14मध्ये राष्ट्रवादीचं होतं. प्रभाग 14 मधील चारही वॉर्डात राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले होते. मात्र, यावेळी तीन वॉर्डांचा एक प्रभाग असणार आहे. या तीनमध्ये एक प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी आणि एक वॉर्ड महिला राखीव झाला आहे. त्याशिवाय मतदारसंघाची फेररचना झाली आहे. जुना प्रभाग क्रमांक 14 आता राहिला नाही. नव्या प्रभाग क्रमांक 14मध्ये अनेक नवे विभाग आले आहेत. त्यामुळे पूर्वी निवडून आलेल्या चारही नगरसेवकांना आपल्या सोयीचा मतदारसंघ निवडावा लागणार आहे. त्यामुळे सेफ मतदारसंघ शोधण्यासाठी नगरसेवक आणि इच्छुकांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. भाजप (bjp), काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि शिवसेनेतही तेच चित्रं दिसत आहे.

सब कुछ राष्ट्रवादी

गेल्या निवडणुकीत म्हणजे 2017च्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14मधील चारही वॉर्डात राष्ट्रवादीचे चारही नगरसेवक निवडून आले होते. हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून संबोधला जातो. प्रभाग 14 अ मधून शोभा साबळे, समिना मेमन, ब मधून मुशीर सैय्यद आणि क मधून सुफी जीन निवडून आले होते. म्हणजे या वॉर्डात दोन महिला आणि दोन पुरुष निवडून आले होते.

प्रभाग क्रमांक 14 अ

हे सुद्धा वाचा
पक्षउमेदवार विजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
शिवसेना
मनसे
अपक्ष/ इतर

डाव कुणाचा? संधी कुणाला?

मागच्या वेळी चार वॉर्डांचा एक प्रभाग होता. आता तीन वॉर्डाचा एक प्रभाग आहे. त्यामुळे यावेळी मागच्यावेळी जिंकून आलेल्या फारच कमी नगरसेवकांना लढण्यासाठी संधी मिळणार आहे. प्रभाग क्रमांक 14 अ हा वॉर्ड अनुसूचित जाती महिलासाठी राखीव झाला आहे. ब वॉर्ड सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला आहे. तर ड वॉर्ड हा जनरल झाला आहे. म्हणजेच पुरुषांना एकाच वॉर्डातून लढण्यास संधी मिळणार आहे. तर स्त्रियांना दोन वॉर्डातून निवडणूक लढण्यास संधी मिळणार आहे. तसेच अनुसूचित जातीच्या उमेदवारालाही अ वॉर्डाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे.

प्रभाग क्रमांक 14 ब

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
शिवसेना
मनसे
अपक्ष/ इतर

मतदार किती?

या मतदारसंघाची लोकसंख्या 33 हजार 158 इतकी आहे. यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 4758 आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 2295 इतकी आहे.

प्रभाग क्रमांक 14 क

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
शिवसेना
मनसे
अपक्ष/ इतर

असा आहे प्रभाग

नव्या प्रभागात सातपूर गांव भाग,जाधव संकुल, समता नगर, पपया नर्सरी, निलकंठेश्वर नगर आणि महादेववाडीचा समावेश आहे.

2017मधील पक्षीय बलाबल

भाजप- 67 शिवसेना- 34 काँग्रेस- 6 राष्ट्रवादी – 6 मनसे 5 एकूण-122

Non Stop LIVE Update
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?.
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?.
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर.
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल.
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.