“छोटे पप्पू महाराष्ट्र सोडून बिहारच्या नेत्यांना भेटले, राज्यातील लोकांवर विश्वास नाही का?”

| Updated on: Nov 27, 2022 | 3:13 PM

नवनीत राणा यांनी आदित्य आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे...

छोटे पप्पू महाराष्ट्र सोडून बिहारच्या नेत्यांना भेटले, राज्यातील लोकांवर विश्वास नाही का?
Follow us on

अमरावती : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “छोटे पप्पू महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यातील नेत्यांना भेटायला गेले राज्यातील लोकांवर विश्वास नाही का?”, असं म्हणत नवनीत राणा यांनी आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackery) निशाणा साधलाय. तसंच त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी 23 नोव्हेंबरला RJD चे नेते तेजस्वी यादव यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीवर शिंदेगटासह भाजपनेही टीका केली. आता खासदार नवनीत राणा यांनी यावर भाष्य केलंय.

नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या कालच्या सभेवरही टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे केवळ टीका करन्यासाठी सभा घेतात. ते म्हणतात शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरा पण माझा सवाल आहे.तुम्ही शेतकऱ्यांसाठी केव्हा मातोश्री सोडणार? तुम्ही अडीच वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं? आपण केव्हा रस्तावर उतरणार?, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

उद्धव ठाकरेंनी विरोधात असताना रत्यावर उतरून लढाई केली पाहिजे.उन्हाचे चटके कार्यकर्त्यांना न देता नेता रत्यावर उतरला पाहिजे, असं राणा म्हणाल्यात.

तीन महिन्यात शेतकऱ्यांचा एकही प्रश्न उरलेला नाही आहे. 100 पेक्षा जास्त निर्णय या सरकारने घेतले आहेत, असंही नवनीत राणांनी म्हटलंय.