AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“शरद पवार आपसे बैर नही, समरजीत तेरी…”, हसन मुश्रीफांनी दिले ओपन चॅलेंज

राष्ट्रवादीचे ४५ पेक्षा जास्त आमदार आहेत, मग तरीही शरद पवार आणि जयंत पाटील हे माझ्याच मागे का लागले आहेत? असा प्रश्न हसन मुश्रीफांनी विचारला. 

शरद पवार आपसे बैर नही, समरजीत तेरी..., हसन मुश्रीफांनी दिले ओपन चॅलेंज
| Updated on: Sep 04, 2024 | 1:23 PM
Share

Hasan Mushrif on Sharad Pawar : भाजप नेते समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत पवार गटात प्रवेश केला. कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकात समरजित घाटगे यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी शरद पवारांनी हसन मुश्रीफांवर जोरदार टीका केली. तसेच समरजित घाटगे फक्त आमदार राहणार नसून त्यांना मंत्रिपद सुद्धा देणार असल्याचे सुतोवाच शरद पवारांनी केले. आता यावर हसन मुश्रीफ यांनी जोरदार निशाणा साधला.

हसन मुश्रीफ यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी समरजित घाटगे यांच्या पक्षप्रवेशावर भाष्य केले. तसेच त्यांनी शरद पवारांबद्दलही भाष्य केले. “पवार साहेब माझे दैवत आहे. मी अजूनही त्यांचा आदर करतो. मग तरीही शरद पवार आणि जयंत पाटील हे माझ्याच मागे का लागले आहेत?” असा सवाल हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला.

“माझ्याच मागे का लागले आहेत?”

“लोकशाहीत एकाद्या वक्तीचे वय 25च्या वर झाले की तो निवडणूक लढू शकतो. आपल्याकडे आता राज्यात सहा पक्ष झाले आहे. त्यामुळे उमेदवारांची संख्या प्रचंड आहे. पवार साहेब माझे दैवत आहे. मी अजूनही त्यांचा आदर करतो. राष्ट्रवादीचे ४५ पेक्षा जास्त आमदार आहेत, मग तरीही शरद पवार आणि जयंत पाटील हे माझ्याच मागे का लागले आहेत? असा प्रश्न हसन मुश्रीफांनी विचारला.

“मंत्री होण्यासाठी निवडून यावे लागतं”

“शरद पवार साहेबांनी कायम प्रजेचा आणि रयतेमधून आलेल्या सामान्य कार्यकर्त्यांचा प्रचार केलेला आहे. राजा विरोधात प्रजा अशी निवडणूक आहे आणि प्रजा कायमच जिंकत असते. मंत्री होण्यासाठी आधी निवडणुकीत निवडून यावे लागतं. मागच्या सहा निवडणुकांमध्ये मी विजय मिळवला आहे. तेव्हा माझ्यासमोर एकापेक्षा एक असे उमेदवार होते. तीन वेळा तिरंगी लढत झाली, तीन वेळा दोघांमध्ये लढत होती, तरीही मी विजय मिळवत आलो आहे”, असे हसन मुश्रीफ म्हणाले.

“शरद पवार आपसे बैर नही, समरजीत अब तुम्हारी खैर नही”

“जयंत पाटील दोन दिवसांपूर्वी आले, त्यांनी सभा घेतली. काल पवार साहेबांनी सभा घेतली, मला समजत नाही की ते माझ्यासारख्या अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांच्या मागे का लागले आहेत? मी पुन्हा म्हणतो की, निवडणुकीत शरद पवार आपसे बैर नही, समरजीत अब तुम्हारी खैर नही”, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले.

कुणालाही कमी लेखून चालत नाही

“ही निवडणूक नायक विरुद्ध खलनायक अशी आहे. पण तसा उल्लेख केला नाही. जयंत पाटील असे बोलूच शकत नाही, ते असे बोललेले नाहीत. यामागे कोण होते ती माणसे कोण होती ते पहा, असेही हसन मुश्रीफ म्हणाले. त्यावेळी हसन मुश्रीफ यांना समरजित घाटगे यांनी तुतारी हाती घेतल्यामुळे काय परिणाम होईल, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर निवडणुकीत काय होईल? याचा निकाल जनता ठरवेल. कुणालाही कमी लेखून चालत नाही”, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली.

29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.