AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUDIO : सुप्रिया सुळेंच्या कथित धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्या राहुल शेवाळे यांना धमकी दिल्याची कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. या कथित ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपची सत्यता अद्याप निश्चित झाली नसून, या ऑडिओ क्लिपला ‘टीव्ही 9 मराठी’ही दुजोरा देत नाही. स्वत: सुप्रिया […]

AUDIO : सुप्रिया सुळेंच्या कथित धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्या राहुल शेवाळे यांना धमकी दिल्याची कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. या कथित ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपची सत्यता अद्याप निश्चित झाली नसून, या ऑडिओ क्लिपला ‘टीव्ही 9 मराठी’ही दुजोरा देत नाही.

स्वत: सुप्रिया सुळे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी यासंदर्भात बोलताना स्पष्ट केले की, अशाप्रकारची कोणतीही धमकी कुणालाही दिली नाही.

ऑडिओ क्लिपमध्ये काय संवाद?

सुप्रिया सुळे – राहुल, मी तुम्हाला कधी अपमानित केलं हो?

राहुल शेवाळे – हॅलो

सुप्रिया सुळे – राहुल, सुप्रिया सुळे बोलते आहे..

राहुल शेवाळे – हा ताई..

सुप्रिया सुळे – मी तुम्हाला कधी अपमानित केलं हो?

राहुल शेवाळे – नाही

सुप्रिया सुळे –  तुमचं स्टेटमेंट आहे..

राहुल शेवाळे – हा, ते..

सुप्रिया सुळे – की पवार, सुळेंनी अपमानित केलं

राहुल शेवाळे – नाही.. नाही

सुप्रिया सुळे –  मी तुम्हाला कधी अपमानित केलं मी?

राहुल शेवाळे – दोन पेपरला चुकीचे स्टेटमेंट आले आहेत, एक सकाळ आहे..

सुप्रिया सुळे – हा..

राहुल शेवाळे – आणि एक मटाला आलं आहे, मटाला तुमचं आणि दादांचं नाव आहे

सुप्रिया सुळे – एक मिनिटं होल्ड करा.. हा.. तुमच्या नावानं स्टेटमेंट आहे.. विजय कोलतेचं नाव कसं घालताय

राहुल शेवाळे – नाही.. नाही.. नाही… तसं नाही म्हटलो तुम्हाला मी.. हे चुकीचे स्टेटमेंट आहे

सुप्रिया सुळे – तुम्ही भाजपात गेलाय, हे ठीक आहे.. एक लक्षात ठेवा, राहुल शेवाळे सुप्रिया सुळेच्या नादी लागू नका..मी कॉन्ट्रॅक्टर नाही आहे, घरात येऊन ठोकून काढेन.. आय ऍम सिरियस..माझी बदनामी केली ना, अब्रुनुकसानीचा दावा करेल.. तुम्ही सगळे उलटतायत आता.. माझ्यासारखी वाईट बाई नाही, मी खरी बाई आहे लक्षात ठेवा.. रेकॉर्ड केलं तरी चालेल..

राहुल शेवाळे – मी ते स्टेटमेंट केलेलं नाही.. चुकीचं स्टेटमेंट त्यांनी छापलं आहे

सुप्रिया सुळे – एनीवे.. लक्षात ठेवा, माझ्या नादी लागू नका.. तुमच्याशी आजपर्यंत गोड वागली आहे.. आय एम व्हेरी ऑनेस्ट लेडी.. माझी बदनामी केली तर, काय करायचं ते मी तिथे येऊन करेल..कारण, मी कोणाची कॉन्ट्रॅक्टर नाही आहे, कुणाच्या बापाचे 5 पैसे खाल्लेले नाही..लक्षात ठेवा..

राहुल शेवाळे – तुमचा गैरसमज होतो आहे, ताई…

मी धमकी दिली नाहीय : सुप्रिया सुळे

कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’कडे प्रतिक्रिया व्यक्त केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय, मी धमकी देत नाही. मी धमकी दिली असेल, तर चॅनेलकडे का जातात? पोलिस ठाण्याकडे जायचं. मला बदनामी का करत आहेत? माझं यश त्यांना बघवत नाही.”

माझ्या वकिलांशी बोलून, अब्रुनुकसानाचा दावा ठोकणार, असेही सुप्रिया सुळे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना सांगितले.

व्हायरल ऑडिओ क्लिपवर राहुल शेवाळे काय म्हणाले?

“माझ्या पक्षांतरामुळे कदाचित नाराज झाल्यामुळे सुप्रिया सुळेंनी धमकी दिली. तुला बघून घेऊ, घरात घुसून मारु अशी धमकी दिली. मी पवार कुटुंबीयांवर टीका केली नाही. माझ्या पक्षांतराची वृत्तपत्रात बातमी आलीय, त्याची सल असावी. मला अज्ञात लोकांचे फोन येत आहेत. माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालीय, पुढे काय करायचे ते अजून ठरवलं नाही.”, असे राहुल शेवाळे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना सांगितले.

पाहा बातमीचा व्हिडीओ :

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.