Monsoon Session: “50 खोके एकदम ओके!, सुधीरभाऊंना चांगलं खातं न सरकारचा धिक्कार असो!”, विधिमंडळ परिसरात घोषणाबाजी, शिंदे सरकार विरोधात विरोधक एकवटले

| Updated on: Aug 17, 2022 | 11:36 AM

महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारचा निषेध केला. "आले रे आले गद्दार आले", असं म्हणत त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला.

Monsoon Session: 50 खोके एकदम ओके!, सुधीरभाऊंना चांगलं खातं न सरकारचा धिक्कार असो!, विधिमंडळ परिसरात घोषणाबाजी, शिंदे सरकार विरोधात विरोधक एकवटले
Follow us on

मुंबई : आज विधिमंडळ अधिवेशन (Monsoon Session) होतंय. हे अधिवेशन किती वादळी ठरणार याची पहिली झलक अधिवेशनाआधी विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीतून दिसून आली. विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांनी घोषणाबाजी केली. “50 खोके एकदम ओके!”,”रोक घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो!”,”सुधीरभाऊंना चांगलं खातं न सरकारचा धिक्कार असो!”, अश्या घोषणा देण्यात आल्या. या घोषणांनी विधिमंडळ परिसर दुमदुमुन गेला होता. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी यावेळी सरकारचा निषेध केला. “आले रे आले गद्दार आले”, असं म्हणत त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यात आघाडीवर होते.

विरोधकांकडून सरकारचा निषेध

आज विधिमंडळ अधिवेशन होतंय. शिंदेगटाच्या बंडानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलंय. नवं सरकार सत्तेत आल्यानंतर आज पहिलं अधिवेशन होतं. त्यामुळे विरोधक जोरदार हल्लाबोल करणार हे निश्चित होतं. पण विरोधकांच्या या निषेधात भर पडली ती क्रिएटिव्ह घोषणाबाजीची… या घोषणाबाजीमुळे विरोधकांचा आवाज मोजक्या अन् ठोस शब्दात सरकारसह जनतेपर्यंत पोहोचला.

हे सुद्धा वाचा

मोजके शब्द, जोरदार प्रहार

“50 खोके एकदम ओके!”,”रोक घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो!”,”सुधीरभाऊंना चांगलं खातं न सरकारचा धिक्कार असो!”, अश्या घोषणा देण्यात आल्या. या घोषणांनी विधिमंडळ परिसर दुमदुमुन गेला होता. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी यावेळी सरकारचा निषेध केला. “आले रे आले गद्दार आले”, असं म्हणत त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला.

धनुभाऊ जोमात!

विरोधकांनी केलेल्या या निषेध आंदोलनात राष्ट्रवादी नेते, परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी खमक्या आवाजात सरकारविरोधात घोषणा दिल्या… “ईडी सरकार हाय हाय… शेतकऱ्याला मदत न करणाऱ्या सरकारचा निषेध असो! ओला दुष्काळ जाहीर न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो” अश्या घोषणा देण्यात आल्या. “सुधीरभाऊंना चांगलं खातं न सरकारचा धिक्कार असो!” आशिष शेलारांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अश्या घोषणा त्यांनी यावेळी दिल्या.