20 सैन्य ही संख्या कमी नाही, लष्करप्रमुख, संरक्षण मंत्री किंवा पंतप्रधानांनी उत्तर द्यावं : जितेंद्र आव्हाड

| Updated on: Jun 20, 2020 | 5:18 PM

आम्ही सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून पंतप्रधानांच्या सोबत आहोत, असे जितेंद्र आव्हाड (NCP Jitendra Awhad On India China Face off) म्हणाले.

20 सैन्य ही संख्या कमी नाही, लष्करप्रमुख, संरक्षण मंत्री किंवा पंतप्रधानांनी उत्तर द्यावं : जितेंद्र आव्हाड
Follow us on

पुणे : “पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनने आक्रमण केलं हे मान्य करायला तयार नाहीत. मग 20 सैनिक कसे मारले गेले. 20 सैनिक मारले जाणं ही संख्या कमी नाही, याची जबाबदारी कोणाला तरी स्वीकारावी लागेल,” असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडी  सरकारमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यावरुन आव्हाडांनी विरोधी पक्षावर जोरदार टीका केली आहे. (NCP Jitendra Awhad On India China Face off)

“पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनने आक्रमण केलं हे मान्य करायला तयार नाहीत. मग 20 सैनिक कसे मारले गेले. 1967 नंतर आजपर्यंत चीनच्या सीमेवर कोणत्याही सैनिकाने प्राण गमावलेले नाही. 20 सैनिक मारलं जाणं ही संख्या कमी नाही, याची जबाबदारी कोणाला तरी स्वीकारावी लागेल. सगळ्यांनी हात वर करुन कसं चालेल,” असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“चीन-भारत सीमाभागात काहीच झालं नाही, असं म्हणणं कसं चालेल, सर्व भारतीयांच्या मनात हा प्रश्न आहे. याचं उत्तर लष्कर प्रमुख, संरक्षण मंत्री किंवा पंतप्रधानांनी द्यायला हवं. एक इंचही जमीन देणार नाही, अशी भूमिका घ्यायला हवी. याबाबत आम्ही सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून पंतप्रधानांच्या सोबत आहोत, पण सत्य समोर यायला हवं,” असे जितेंद्र आव्हाडांनी यावेळी म्हटलं.

महाविकासआघाडीत कोणत्याही कुरबुरी नाहीत

“विरोधी पक्ष नको त्या गोष्टीचं राजकारण करत आहेत. महाविकासआघाडीत कोणत्याही कुरबुरी नाहीत. आम्ही प्रेमाने वागतोय, निर्णय घेतोय,” असे राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“विरोधी पक्ष नको त्या गोष्टींचं राजकारण करत आहे. सध्या परिस्थिती अवघड आहे. ती अमान्य करुन चालणार नाही. या शहरावर आरोग्य यंत्रणेचा ताण पडणार यावर कोणाचं दुमत नाही. परिस्थिती हाताच्या बाहेर असून ही आपात्कालीन परिस्थिती आहे. महाविकास आघाडीत कोणत्याही कुरबुरी नाहीत, आम्ही प्रेमान वागतोय, निर्णय घेतोय, पुढे जाण्याच्या मानसिकतेतून काम करतोय,” असा टोलाही जितेंद्र आव्हाडांनी लगावला.

“झोपडपट्टी पुर्नवसनासाठी समिती स्थापन करणार”

“बांधकाम व्यावसायिकांनी झोपडपट्टी पुर्नवसन करण्यासाठी अनेक कल्पना सुचवल्या आहेत. त्या कल्पनांचा उपयोग आणि त्यांची अंमलबजावणी कशी करता येईल, यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. लवकरच या समितीची नावं जाहीर केली जातील. यात निवृत्त सनदी अधिकारी, महापालिकेचे अधिकारी यांचा समावेश असेल,” असेही जितेंद्र आव्हाडांनी सांगितले.

“पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्टी पुनर्वसनाचा नवीन साचा ही समिती तयार करेल. त्याचबरोबर झोपडपट्टीवासियांसाठी ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आव्हाडांनी सांगितले.

“एसआरएची योजना ही कायद्याप्रमाणे आहे. त्याला महापालिका छेद देऊ शकत नाही,” असेही आव्हाड यावेळी म्हणाले. (NCP Jitendra Awhad On India China Face off)

संबंधित बातम्या : 

PM Narendra Modi | एक इंच जमीनवरही चीनचा कब्जा नाही, सैन्याला सर्व सूट, आमच्याकडेही Fighter Planes : मोदींनी ठणकावलं

आमची काही नाराजी नाही, मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा : काँग्रेस