AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इतक्या दिवस झोपी गेले होते का? राज ठाकरेंच्या टीकेला अजित पवारांचे प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले?

अजित पवार (Ajit Pawar) आज शिर्डीच्या (Shirdi) दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते यावेळी विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.  यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली आहे.

इतक्या दिवस झोपी गेले होते का? राज ठाकरेंच्या टीकेला अजित पवारांचे प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले?
अजित पवार
| Edited By: | Updated on: Apr 06, 2022 | 2:35 PM
Share

शिर्डी : अजित पवार (Ajit Pawar) आज शिर्डीच्या (Shirdi) दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते यावेळी विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.  यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये झालेल्या आघाडीवर टीका केली होती. या टीकेचा समाचार अजित पवार यांनी घेतला आहे. इतक्या दिवस झोपा काढल्या का? असा सवाल अजित पवारांनी केला आहे. काही लोक समाजामध्ये दरी निर्माण करण्याचे काम करतात, मात्र त्यांनी लक्षात घ्यावे की धर्मावर आधारीत राजकारण फार काळ टिकत नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

अजित पवार नेमके काय म्हणाले?

अजित पवार यांनी राज ठेकरेंवर नाव न घेता टीका केली आहे. राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. या टीकेला पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते आज शिर्डीत बोलत होते. इतक्या दिवस काय झोपला होता का असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे. आमचे विचार जरी वेगळे असले तरी मात्र आम्ही एकत्र आलो आहोत. काही लोक समाजात फूट पाडण्याचे काम करतात. मात्र त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, धर्मावरील राजकारण फार काळ टिकत नसल्याचे पवार म्हणाले आहेत.

विकास कामांची घोषणा

अजित पवार आज शिर्डी दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले आहे. दरम्यान यावेळी अजित पवार यांनी विविध विकास कामांची घोषणा देखील केल्याचे पहायला मिळाले. कोपरगाव ग्रामिण पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीसाठी चार कोटी रुपये देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. तसेच कोपर गाव शहरातील भूमिगत गटारीचा प्रश्न देखील लवकरता लवकर मार्गी लावला जाईल असे अश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.  तसेच त्यांनी विकासाच्या बाबतीत राजकारण करणार नसल्याचे देखील म्हटले आहे.

संबंधित बातम्या

PM Modi Sharad Pawar Meet: ईडीचे रेड ते राज ठाकरेंचा ‘हिंदूत्ववादी भोंगा’; ते पाच कारणे ज्यासाठी शरद पवार-मोदी भेट अत्यंत महत्त्वाची

Sharad Pawar meets PM Modi: शरद पवार यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; 25 मिनिटे चर्चा; चर्चेचा तपशील गुलदस्त्यात

Video Sudhir Mungantiwar : जातीय दंगल होऊ शकते असं म्हणणाऱ्या जयंत पाटलांची चौकशी करावी, नागपुरात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!