सदाभाऊंना उतारवयात आराम करता यावा म्हणूनच फडणवीसांनी त्यांना विश्रांती दिलीय -अमोल मिटकरी

राज्यसभेनंतर राज्यात विधानपरिषद निवडणुकीचं वारं वाहतंय. सदाभाऊ खोत यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. तो निवडणूक अर्ज सदाभाऊ खोत यांनी मागे घेतला. त्यावर ट्विटच्या माध्यमातून अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे.

सदाभाऊंना उतारवयात आराम करता यावा म्हणूनच फडणवीसांनी त्यांना विश्रांती दिलीय -अमोल मिटकरी
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 7:17 PM

मुंबई : विधान परिषदेची निवडणूक अवघ्या सात दिवसांवर आली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटची अवघी काही मिनिटं उरलेली असताना अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यावरून आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यांची खिल्ली उडवली जात आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून सदाभाऊंना टोला लगावला आहे.

मिटकरींचा सदाभाऊंना टोला

सदाभाऊंना उतारवयात आराम करता यावा म्हणुनच फडणवीसांनी त्यांना विश्रांती दिलीय, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी सदाभाऊंना टोला लगावला आहे. “सदाभाऊंना उतारवयात आराम करता यावा म्हणूनच फडणवीसांनी आपणास विश्रांती घ्यायचा सल्ला दिलाय, मात्र आपण माघार घेतली यावर विश्वासच बसत नाही. पण सदाभाऊ त्या फडणविसांना सांगा, म्हणावं, “म्या एक पाऊल मागं आलुया म्हंजी थकलो नाय… आणखी दोन पावलं माग येऊन सन्या गुमान बसलं”, असं ट्विट मिटकरींनी केलं आहे.

हे सुद्धा वाचा

8 जूनला भाजपने आपली उमेदवार यादी प्रसिद्ध केली तेव्हा त्यात सदाभाऊ आणि विनायक मेटे यांचं नाव नसल्याने अमोल मिटकरी यांनी एक शायरी ट्विट केली होती.”बेवजह नही रोता ईश्क मे कोई गालिब, जिसे खुद से बढ कर चाहो, वो रुलाता जरूर हैं ll “, असं ट्विट त्यांनी केलं ज्याची जोरदार चर्चा रंगली.

सदाभाऊ खोत यांचा अर्ज मागे

सदाभाऊ खोत यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. तो निवडणूक अर्ज सदाभाऊ खोत यांनी मागे घेतला. तसंच शिवाजीराव गर्जे यांनी राष्ट्रवादीकडून डमी अर्ज भरलेला होता तोही अर्ज आता मागे घेण्यात आला आहे. पण काँग्रेसने आपला अर्ज मागे न घेतला नाही.

Non Stop LIVE Update
अजितदादांना मोठा धक्का, निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा
अजितदादांना मोठा धक्का, निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा.
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.