
सांगली : सांगलीमध्ये (Sangli) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील , महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम , सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार श्रिनिवास पाटील, महादेव जानकर, उत्तमराव जानकर उपस्थित होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर (Sakshana Salgar) उपस्थित होत्या. सक्षणा सलगर यांनी या कार्यक्रमात भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर टीका केली आहे. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या उपस्थित 27 मार्चला अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं उद्घाटन ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करुन करण्यात आलं होतं. त्यावरुन सक्षणा सलगर यांनी 27 तारखेला एका माणसानं जो काही कालवा केला तो पेशवाईच्या नादी लागून केला असल्याची टीका केली.
मी धनगर समाजाची मुलगी आहे. 27 तारखेला एका माणसानं जो काही कालवा केला तो आपण पाहिला. धनगर समाजाची ही माणसं नाहीत पेशवाईच्या नादी लागून धनगर समाजाला दावणीला बांधण्याचं काम त्यांनी केलंय. आम्ही धनगर आहोत काठी आणि घोंगडं घेणारी माणसं आहोत. सक्षणा सलगर यांनी गोपीचंद पडळकरांवर टीका राम शिंदे हे सुसंस्कृत आहेत…राम शिंदेंनी आम्हाला घरी बोलावलंय, असं म्हटलंय.
सक्षणा सलगर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना एका जातीत कशाला अडकवता असा सवाल केला. भाजपच्या जोडीला कशाला हवा होता तो खट्याळ खिलार बैल, अशा शब्दात सक्षणा सलगर यांनी सदाभाऊ खोतांवर टीका केली,
तुम्हाला मतदारसंघातून निवडून येता येत नाही. देवेंद्र फडणवीस धनगर समाजाची लोकं हत्यार म्हणून वापरतत असाल तर खबरदार एकट्या पडळकरांच्या जोरावर उड्या मारू नका, असं सक्षणा सलगर म्हणाल्या. नागपूरच्या तंबूत बांधून ठेऊ, असा इशारा गोपीचंद पडळकरांना सक्षणा सलगर यांनी दिला. मुलगी समजू नका फ्लावर समझे क्या फायर है हम असंही त्या म्हणाल्या.
‘मनसे भाजपची बी टीम बनली’, जयंत पाटलांचा राज ठाकरेंवर पलटवार; भाजपवरही निशाणा