AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मनसे भाजपची बी टीम बनली’, जयंत पाटलांचा राज ठाकरेंवर पलटवार; भाजपवरही निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनही राज ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मनसे ही भाजपची बी टीम बनली असल्याचा पलटवार केलाय.

'मनसे भाजपची बी टीम बनली', जयंत पाटलांचा राज ठाकरेंवर पलटवार; भाजपवरही निशाणा
राज ठाकरे, जयंत पाटीलImage Credit source: TV9
| Updated on: Apr 02, 2022 | 10:52 PM
Share

सांगली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात शिवतीर्थावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून राज्यात जातीवाद फोफावल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलाय. इतकंच नाही तर शरद पवारांनाच ते हवं होतं, असा घणाघातही राज यांनी केलाय. राज ठाकरे यांच्या या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय. अशावेळी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनही राज ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मनसे ही भाजपची बी टीम बनली असल्याचा पलटवार केलाय.

राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, ‘मी अजून त्यांचं भाषण पाहिलं नाही आणि आता पाहणारही नाही. पण भाजपने अशा बऱ्याच बी टीम बाळगायला सुरुवात केलीय. कारण भाजपची एकट्याची डाळ शिजत नाही. मग त्यात एमआयएम आहे, राज ठाकरेंचा मनसे आहे, अजून आहेत. मतं खाणे आणि आपलं राजकारणातलं अस्तित्व टिकवणे हाच एक ऑप्शन राहिला आहे त्यांच्यापुढे. त्यामुळे हे चालू राहील’, अशा शब्दात जयंत पाटील यांनी मनसे आणि भाजपवर पलटवार केलाय.

‘राज्याच्या राजकारणात त्यांना महत्व उरलं नाही’

आता स्वत:चं महत्व वाढवण्यासाठी शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय आपल्याला कोण विचारणार नाही, त्यांचं कुणी ऐकत नाही. त्यामुळे अशा विझत चाललेल्या लोकांबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही. चौकशी लागली की माणसं रिव्हर्स गिअर टाकतात. त्यांचा रिव्हर्स गिअर मागेच पडलाय. विधानसभेत कोणतंही स्थान नाही. राज्याच्या राजकारणातील महत्व उरलं नाही. भाजप एक नंबरचा पक्ष म्हणजे किती तर 105. राज्यात तिन पक्षाचं सरकार स्थापन होऊन चांगलं चाललं आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या नेतृत्वात सरकार चांगलं चाललंय. त्यामुळे त्यांना फारसं महत्वं नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी राज ठाकरेंना लगावलाय.

राज ठाकरेंचा राष्ट्रवादी आणि पवारांवर आरोप काय?

‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच राज्यात जातीवाद फोफावला. 1999 ला राष्ट्रवादीचा जन्म झाला. त्यानंतर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू झालं. या आधी जात नव्हती का तर होती. पण त्यावेळी जातीचा अभिमान होता. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. त्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष करायला लावला गेला’, असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केलाय.

‘राष्ट्रवादीने दुसऱ्या जातीबद्दल द्वेष करायला लावला’

1999ला राष्ट्रवादीचा जन्म झाला. त्यानंतर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू झालं. या आधी जात नव्हती का तर होती. पण त्यावेळी जातीचा अभिमान होता. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. त्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष करायला लावला. फूट पाडत पाडत कधी मराठा आरक्षणाचं अमिष दाखवायचं. बाबासाहेब पुरंदरे यांना सॉफ्ट टार्गेट केलं गेलं. इतिहास वाचायचा नाही. लिहिलंय कुणी, पुरंदरे ब्राह्मण. अच्छा अच्छा.. म्हणजे त्याने काही तरी चुकीचं लिहिलं असणार. आम्ही इतिहास वाचतच नाही. ज्या छत्रपती शिवरायाने स्वराज्यासाठी एक व्हा सांगितलं. तिथे जातीपातीवरून वाद सुरू आहे. राजकारण सुरू आहे. जातीतून बाहेर नाही पडणार तर हिंदू कधी होणार? असा सवालही राज यांनी यावेळी विचारला.

इतर बातम्या : 

Raj Thackrey Speech Live : ‘पहिल्यांदा कुटुंबाला सांग, मुंबई पालिकेत जाऊ नको म्हणून’, उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचा सल्ला

Raj Thackrey : ‘साला पळून कोणा बरोबर गेली, लग्न कोणा बरोबर केलं?’ उद्धव ठाकरेंच्या जुगाडावर राज ठाकरेंचं थेट बोट

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.