Raj Thackrey Speech Live : ‘पहिल्यांदा कुटुंबाला सांग, मुंबई पालिकेत जाऊ नको म्हणून’, उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचा सल्ला

उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बोलताना भाजपवर जोरदार टीका केली होती. हाच धागा पकडत राज यांनी आज उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. 'माझ्या कुटुंबाला हात लावत असाल तर मला अटक करा. पहिल्यांदा कुटुंबाला सांग महापालिकेत जाऊ नको म्हणून', अशा शब्दात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

Raj Thackrey Speech Live : 'पहिल्यांदा कुटुंबाला सांग, मुंबई पालिकेत जाऊ नको म्हणून', उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचा सल्ला
उद्धव ठाकरे, राज ठाकरेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 10:02 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) गुढीपाडवा मेळाव्यात काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. शिवतीर्थावर पार पडलेल्या मेळाव्यात राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून ते आता महाविकास आघाडीच्या नेत्यांवरील सुरु असलेल्या धाडीपर्यंत सर्वच मुद्द्यांवर भाष्य केलं. राज यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं. उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची मालमत्ता आयकर विभागानं सील केलीय. त्यावरुन उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बोलताना भाजपवर जोरदार टीका केली होती. हाच धागा पकडत राज यांनी आज उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. ‘माझ्या कुटुंबाला हात लावत असाल तर मला अटक करा. पहिल्यांदा कुटुंबाला सांग महापालिकेत जाऊ नको म्हणून’, अशा शब्दात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

‘राजकारण तुम्हाला करायचं असेल तर समोरच्यांनाही येतं’

राज ठाकरे म्हणाले की, ‘त्या दिवशी मुख्यमंत्री विधानसभेत ठणकावून सांगत होते की, माझ्या कुटुंबाला हात लावत असाल तर मला अटक करा. पहिल्यांदा कुटुंबाला सांग महापालिकेत जाऊ नको म्हणून. पालिकेचे व्यवहार बघायचे. यांना ईडीची नोटीस आली. मलाही आली. गेलो ना. यांना चार महिन्यापूर्वी आली, गेले नाही. संपत्ती जप्त केली तेव्हा मुख्यमंत्र्यांना राग आला. तेव्हा म्हणतात कुटुंबावर येणार असेल तर मला अटक करा. हे सर्व 2019चं आहे. अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद हवं होतं ना मग भोगा आता. राजकारण तुम्हाला करायचं असेल तर राजकारण समोरच्या लोकांनाही येतं. या असल्या नादान राजकारणाला तुम्ही बळी पडू नका’, अशा शब्दात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवलाय.

हल्ली आई-वडील म्हणतात ‘यशवंत जाधव’ हो!

यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाने रेड टाकली. दोन दिवस रेड होती. मोजत काय होते? हल्ली आई-वडील यशवंत हो सांगत नाही. तर यशवंत जाधव हो असं सांगतात. पालिकेत खा खा खाल्ले ते पैसे कुठे आहेत? व्हॉट्सअॅपवर जुन्या मुंबईचे फोटो येतात किती सुंदर वाटते. बीएसटीचा रंग बदलला. लोकं कसे चढतात, घाटकोपरला चाललोय कि अहमदाबादला हेच कळत नाही. याचं कारण तुम्ही आहात, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केलीय.

इतर बातम्या : 

Raj Thackrey Speech : ‘राष्ट्रवादीनं दुसऱ्या जातीचा द्वेष करायला लावला’, राज ठाकरेंचा शरद पवारांवर पुन्हा थेट आरोप

Raj Thackrey : ‘साला पळून कोणा बरोबर गेली, लग्न कोणा बरोबर केलं?’ उद्धव ठाकरेंच्या जुगाडावर राज ठाकरेंचं थेट बोट

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.