‘आज गांधी, नेहरू, आझाद यांच्या सारख्यांवर टीका करण्यात धन्यता मानणारं नेतृत्व’, शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल

देशामध्ये धर्माच्या नावावर माणसांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करून नागरिकांमध्ये अंतर निर्माण करण्याचे काम केले जात आहे, गंभीर आरोपही शरद पवार यांनी केला.

'आज गांधी, नेहरू, आझाद यांच्या सारख्यांवर टीका करण्यात धन्यता मानणारं नेतृत्व', शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 6:25 PM

सांगली : महात्मा गांधी (Mahatma Gandhi), जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru), मौलाना आझाद यांच्यासह इतरांनी स्वातंत्र्यासाठी योगदान दिले. देश उभारणीसाठी कष्ट केले त्यांचा सन्मान, आदर ठेवण्याऐवजी त्यांच्यावर टिका टिपण्णी करणं यावर धन्यता मानणारं नेतृत्व आज दुर्दैवाने देशात बघायला मिळतं आहे. त्याचा परिणाम लोकांमध्येही एकप्रकारची अस्वस्थता आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलीय. ते आज सांगली – शिराळा येथील शेतकरी मेळाव्यात केलं. यावेळी बोलताना महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद ही त्या काळातील नेतृत्वाची पिढी होती. त्यांनी स्वातंत्र्य उभे करण्यासाठी कष्ट केले आणि नंतर देश उभा करण्यासाठी प्रचंड योगदान दिले, असंही पवार म्हणाले.

पावारांच्या उपस्थितीत शिवाजीराव नाईकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

‘धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु’

आज देशाचं राजकारण एका वेगळ्या दिशेला जातंय आणि राज्य वेगळ्या विचारांच्या लोकांच्या हातात आहे. हा शिराळा तालुका आणि या सांगली – सातारा जिल्ह्यामधून कर्तृत्ववान नेतृत्वाची मालिका होऊन गेली. ज्यामध्ये यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजाराम बापू व अशी अनेक नावं आहेत. अशी अनेक कर्तृत्ववान माणसे तयार झाली त्यांनी स्वातंत्र्यासाठी योगदान दिले. लोकांच्या जीवनात चांगले दिवस येतील यादृष्टीने काम केले. या नेत्यांनी विकासाचं व माणसं जोडण्याचं राजकारण केलं. आज मात्र देशामध्ये धर्माच्या नावावर माणसांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करून नागरिकांमध्ये अंतर निर्माण करण्याचे काम केले जात आहे, गंभीर आरोपही शरद पवार यांनी केला.

‘धर्मांधांविरोधात लढाई लढायची आहे’

गेल्या पाच वर्षांतील महाराष्ट्रासुध्दा गेल्या दोन वर्षांत एका वेगळ्या विचाराचे राज्य आलं. जे पूर्वी कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं. देशाला हेच चित्र दिसलं या सगळ्या कालखंडात सामाजिक ऐक्य या गोष्टी संबंधी वेगळी भूमिका मांडली गेली. काल परवा भाजपशासित कर्नाटक राज्यात अल्पसंख्याक समाजाच्या दुकानातून मालाची खरेदी करू नका, अशा प्रकारचा फतवा काही संघटनानी काढला. शेवटी व्यवसाय करायचा असेल तर दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, बहुसंख्याक करु शकतो त्याचा व्यवसाय चांगला असेल, व्यवहार चांगला असेल, माल चांगला असेल तर त्याचा आदर करण्याची वृत्ती आपल्या समाजात आहे. परंतु हा या जातीचा, हा या धर्माचा म्हणून तिथे मालच घेऊ नका याप्रकारची कटुता निर्माण करायचे काम जर राज्य हातामध्ये असलेले घटक करू लागले, तर देश पुढे कसा जाईल? सामाजिक आणि राजकीय ऐक्य कसं ठेवायचं हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे. आज या धर्मांध वृत्तीच्या विरोधात सुध्दा एकप्रकारची लढाई आपल्याला लढायची आहे, असं आवाहनही पवार यांनी केलंय.

इतर बातम्या :

‘शरद पवारांनी देशाचं पंतप्रधान व्हावं’, महाविकास आघाडी नव्हे तर भाजप जवळच्या नेत्यांचं वक्तव्य!

हे सरकार लुटारूंचं, भाजपची लुटीत वाट्यासाठी वाटचाल, प्रकाश आंबेडकरांचा निशाणा

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.