Raj Thackrey Speech Live : मोदींची स्तुती, योगींना प्रशस्तीपत्र, मुंबई पालिकेसाठी राज ठाकरेंची उत्तर भारतीय मतदारांवर डोळा?

राज ठाकरेंच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे टीकेचा रोख होता.मात्र, राज ठाकरे यांनी आजच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली नाही.

Raj Thackrey Speech Live : मोदींची स्तुती, योगींना प्रशस्तीपत्र, मुंबई पालिकेसाठी राज ठाकरेंची उत्तर भारतीय मतदारांवर डोळा?
नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ राज ठाकरे
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 11:08 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज दादर येथील शिवाजी पार्क येथील गुढी पाडवा मेळाव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. राज ठाकरेंच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे टीकेचा रोख होता.मात्र, राज ठाकरे यांनी आजच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपवर टीका केली नाही. राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशात भाजपचं पुन्हा सरकार आलं. तिथं विकास होतोय हेच पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा मनसेला मुंबई महापालिका निवडणुकीत फायदा होणार का हे पाहावं लागणार आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

उत्तर प्रदेशचा निकाल लागला. तिथे विकास होतोय. हेच पाहिजे. मोदी सत्तेत आल्यावर उत्तर प्रदेश बिहार झारखंडकडे त्यांनी पहावं. या तीन राज्यातून लोक बाहेर पडतात हे मी 2014 मध्ये बोलत होतो. तिकडे विकास होतोय हे ऐकून आनंद वाटतो. प्रत्येक राज्यात व्हाव. सर्वांचं ओझं घ्यायला महाराष्ट्र बसला नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी याद्वारे एक प्रकारे नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाचं कौतूक केलं आहे.

राज ठाकरेंना मुंबई महापालिकेत फायदा होणार?

आगामी काळात मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. मुंबईतील मराठी मतदारांचा टक्का हा आता 35 ते 40 टक्क्यांच्या दरम्यान आलेला आहे. यामुळं मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवायची असल्यास इतर भाषिक मतदारांच्या मतांची गोळा बेरिज असणं आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज केलेल्या भाषणात नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ याचं कौतुक केलंय,त्यामुळं उत्तर भारतीय सोबत गुजराती मतदारांचा मनसेला फायदा होऊ शकतो का हे पाहावं लागेल.

पाहा व्हिडीओ

तीन नंबरचा पक्ष एक आणि दोन नंबरच्या पक्षाला फिरवत होता

भाजप एक नंबरचा पक्ष, शिवसेना दोन नंबरचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस तीन नंबरचा पक्ष होता. तीन नंबरचा पक्ष एक आणि दोन नंबरच्या पक्षाला फिरवत होता. महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगता. तुमचं अडीच अडीच वर्ष ठरलं होतं. तुमचं आतलं झंगाट होतं. तुम्हाला मतदान भाजप आणि शिवसेना म्हणून केलं होतं. शरद पवारांसोबत जाण्यासाठी केल नव्हतं. आम्ही सगळं विसरुन जातो. तास तास दोन तास उभे होतो. भाषण ऐकली, मतदन केलं निर्णय आला त्यावेळी महाराष्ट्राचा निर्णय वेगळा दिसला. याच्यासाठी मतदान करता, गुलाम आहात यांचे कोणीही यावं आणि फरपटतं न्यावं. लोकांनी विसरुन जावं हे यांना हवं आहे.

इतर बातम्या:

‘मनसे भाजपची बी टीम बनली’, जयंत पाटलांचा राज ठाकरेंवर पलटवार; भाजपवरही निशाणा

Malaika Arora Accident : मलायका अरोराचा खोपोलीत अपघात, थोडक्यात बचावली, तीन-चार गाड्या आदळल्या

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.