गोपीचंद पडळकर देवेंद्र फडणवीस जेवढी स्क्रिप्ट देतात तेवढंच करतात, सक्षणा सलगर यांचा आरोप

गोपीचंद पडळकर देवेंद्र फडणवीस जेवढी स्क्रिप्ट देतात तेवढंच करतात, सक्षणा सलगर यांचा आरोप
गोपीचंद पडळकर सक्षणा सलगर
Image Credit source: TV9

तुमचा अनांगोदी कारभार चाललाय तो देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाननं चाललाय, असा आरोप गोपीचंद पडळकर यांच्यावर सक्षणा सलगर यांनी केला आहे. तुम्हाला भाजपचा अंजेडा चालवण्यसाठी आमदार केलंय का, असा सवाल सक्षणा सलगर यांनी केला.

संतोष जाधव

| Edited By: Yuvraj Jadhav

Mar 27, 2022 | 10:22 PM

उस्मानाबाद : राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या (NCP) प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर (Sakshana Salgar) यांचा गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सांगली येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण ड्रोनद्वारे पुष्पअर्पण करुन केल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला होता. यावेळी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्यासह गोपींचद पडळकर यांना मानणारे मेंढपाळ बांधव उपस्थित होते. गोपींचद पडळकर यांच्याकडून करण्यात आलेल्या आजच्या स्मारकाच्या लोकार्पणावरुन सक्षणा सलगर आक्रमक झाल्या आहेत. गोपीचंद पडळकर हे आराजकता पसरवून सलोखा व समाजिक सलोखा बिघडवत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या ईशाऱ्यावर पडळकर यांचे काम सुरु, असल्याचा आरोप सक्षणा सलगर यांनी केला आहे. पडळकर यांनी बिरोबाची खोटी शपथ घेतली, बिरोबा त्यांचा खेळखंडोबा करेल, अशी टीका देखील सक्षणा सलगर यांनी केली आहे.

गोपीचंद पडळकरांनी सामाजिक सलोखा बिघडवला

आज मी संपूर्ण महाराष्ट्रात टीव्ही चॅनलेच्या माध्यमांमधून भाजपनं गोपीचंद पडळकर यांची नियुक्ती वायफळ बडबड करण्यासाठी आणि हायव्होल्टेज ड्रामा करण्यासाठी केली आहे. त्यांचा हायव्होल्टेज ड्रामा टीव्हीवर पाहिला. ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या केवळ महाराष्ट्राच्या नव्हे तर अखंड भारताचं दैवत आहेत. ज्यांनी या राज्याला देशाला सामाजिक आणि शैक्षणिक मूल्य दिलेली आहेत. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण करण्याचा कार्यक्रम ठरलेला असताना आणि विष्णू माने हे मेंढपाळ बांधव आहेत त्यांना क्रेडिट मिळेल. शरद पवार यांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम होणार होता. राज्यातील मेंढपाळ बांधवांच्या उपस्थित तो कार्यक्रम होणार होता मात्र गोपीचंद पडळकर यांना ते पाहावत नव्हतं आणि अराजकता माजली पाहिजे. महाराष्ट्रातील सलोखा बिघडवण्याचं काम गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे, असा आरोप सक्षणा सलगर यांनी केला आहे.

महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावलं

आज गोपींचद पडळकर म्हणत होते मी केलं. तुम्ही मेंढपाळ बांधवांसाठी केलेलं एक काम सांगा, असं सक्षणा सलगर म्हणाल्या.प्रत्येक वेळेस ही पहिली वेळ नाही महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावण्याची यापूर्वी पुरंदर येथील जेजुरी संस्थानाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा होता तिथं देखील तुम्ही असंच केलं होतं. तर, देशातल्या राज्यातल्या जनतेला, महाराष्ट्रातील मेंढपाळ बांधवांना आपापसात भिडवण्याचा प्रयत्न करताय.

सक्षणा सलगर यांचं फेसबुक लाईव्ह

देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर अनागोंदी कारभार

आज विष्णू माने या धनगर बांधवानं पुतळ्याचं बांधकाम करण्यासाठी प्रयत्न केला. ते असताना त्यांचा 2 एप्रिलचा कार्यक्रम ठरला. देशातील राज्यातील नेते तिथं येणार आहेत, हे तुम्हाला बघवत नाही. हे फडणवीसांच्या इशाऱ्यावर तुम्ही नाचताय. तुमचा अनांगोदी कारभार चाललाय तो देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाननं चाललाय, असा आरोप गोपीचंद पडळकर यांच्यावर सक्षणा सलगर यांनी केला आहे. तुम्हाला भाजपचा अंजेडा चालवण्यसाठी आमदार केलंय का, असा सवाल सक्षणा सलगर यांनी केला. देवेंद्र फडणवीस जेवढी स्क्रिप्ट देतात तेवढा कार्यक्रम करणे, असं तुमचं सुरु असल्याचं सक्षणा सलगर म्हणाल्या.

राम शिंदे कुठं गेले, महादेव जानकर का सोबत नाहीत

तुमच्या सोबतीला सदाभाऊ खोत असतात. पक्षाचं बाजूला ठेऊ, राम शिंदे कुठं गेले? तुम्ही महादेव जानकर यांना सोबत घेत नाहीत. तुम्ही एकला चलो रे ची भूमिका घेतो. फक्त मीच जंगलात राज करणार अशी भूमिका असेल तर ती गैरसमज आहे.सांगलीमध्ये आरेवाडीत भाजपला आईनं सांगितलं तरी मतदान करणार नाही अशी शपथ बिरोबा आणि खंडोबा यांची खोटी घेतली होती. तो बिरोबा आणि खंडोबा तुमचा खेळखंडोबा केल्याशिवाय राहणार नाही, असं सक्षणा सलगर म्हणाल्या. 2 एप्रिलला विष्णू माने यांनी आयोजित केलेला कार्यक्रम होणार, तुमची अनागोंदी चालू देणार नाही, असं सक्षणा सलगर म्हणाल्या.

इतर बातम्या :

‘आयुक्तांच्या घरी पाण्याचे प्रेशर चांगलं, पण त्यांना इतर प्रेशरच जास्त’, गिरीश बापट यांची टोलेबाजी

PBKS vs RCB faf du plessis: डुप्लेसीच्या धमाकेदार खेळीनंतर, CSK मोठ्या प्रमाणात ट्रोल, पोट धरुन हसवणारे भन्नाट मीम्स व्हायरल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें