संजय राऊत आजचे आचार्य अत्रे, छगन भुजबळांची स्तुतिसुमनं

| Updated on: Dec 26, 2019 | 1:21 PM

शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच, असं संजय राऊत पहिल्यापासून सांगत होते. ते आजचे आचार्य अत्रे आहेत, असं भुजबळ म्हणाले

संजय राऊत आजचे आचार्य अत्रे, छगन भुजबळांची स्तुतिसुमनं
Follow us on

नाशिक : शिवसेना खासदार संजय राऊत म्हणजे आजचे आचार्य अत्रे आहेत, अशा शब्दात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी स्तुतिसुमनं उधळली. नाशिक जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याला संजय राऊत आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर (Chhagan Bhujbal on Sanjay Raut) आले होते.

शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच, असं संजय राऊत पहिल्यापासून सांगत होते. ते आजचे आचार्य अत्रे आहेत, असं भुजबळ म्हणाले. मंत्री झाल्यानंतर हा माझा पहिला कार्यक्रम आहे. अध्यक्ष म्हणून राऊत यांच्या माध्यमातून चांगली व्यक्ती मिळाली, असं सांगायलाही छगन भुजबळ विसरले नाहीत.

मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्र्यांना गागाभट्टच शोधावे लागतील : प्रसाद लाड

नाशिकला अनेक विकास कामं 2014 पूर्वी अंमलात आणली आहेत. जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीचं कामही लवकर होण्यासाठी प्रयत्न करणार, असं भुजबळ म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली. नाशिकमध्ये दीड हजार कोटी रुपयांपर्यंत निधी मिळणार आहे. हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेच पाहिजेत, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी याची काळजी घ्यावी, अशी सूचना छगन भुजबळ यांनी यावेळी केली.

शिवथाळी योजना ही एक पायलट योजना (प्रायोगिक) आहे. त्याचा विस्तार केला जाणार आहे. नागपूरमध्ये मेट्रो जाम झाली आहे, मुंबईची मोनोरेल देखील फेल झाली, पण नाशिकचं नाशिकपण टिकलं पाहिजे, शहराचं सौंदर्य सुद्धा टिकलं पाहिजे, अशी अपेक्षा छगन भुजबळ यांनी व्यक्त केली (Chhagan Bhujbal on Sanjay Raut).